शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 12:49 IST

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड सोनम रघुवंशी ही ९ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील नंदगंज येथील एका ढाब्यावर सापडली.

इंदूरच्या राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंड सोनम रघुवंशी ही ९ जून रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील नंदगंज येथील एका ढाब्यावर सापडली. पण याच दरम्यान सोनमला आणखी दोन जणांनी मदत केली. मदत करणारे ते दोघे कोण याबाबत माहिती समोर आलेली नाही. ज्यांच्या मदतीने सोनम वाराणसीला पोहोचली आणि वाराणसीहून गाझीपूरमधील चहाच्या टपरीवर पोहोचली. सध्या शिलाँग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

९ जून रोजी सकाळी गाझीपूरच्या नंदगंज भागातील काशी टी स्टॉलवर पोहोचलेल्या सोनम रघुवंशीसह राजा रघुवंशीच्या हत्येत सहभागी असलेले पाचही पात्र शिलाँग पोलिसांच्या ताब्यात आहेत, परंतु आता या हत्या प्रकरणातील आणखी दोन जणांचा शोध सुरू आहे. हे दोन्ही संशयित सोनमचे मदतनीस आहेत ज्यांच्यासोबत ती वाराणसी रेल्वे स्टेशनवर आणि नंतर कॅन्ट बस स्टेशनवर दिसली होती, ज्यांच्यासोबत सोनम गोरखपूरला जाणाऱ्या बसमध्ये चढली होती.

"मी कोणाशीही लग्न केलं तरी मी तुझीच गर्लफ्रेंड...", सोनमसमोर स्टेजवर ढसाढसा रडला राज

गाझीपूरच्या सैदपूर भागातील रहिवासी उजाला यादवची देखील यामध्ये नवी एन्ट्री झाली आहे. जिने दावा केला की, ८ जूनच्या रात्री सोनम आणि ती गोरखपूरला जाणाऱ्या बसने एकत्र प्रवास करत होते. ८ जून रोजी रात्री १०:०० वाजता उजाला यादव वाराणसी रेल्वे स्टेशनवर उतरली तेव्हा सोनम त्याच कपड्यांमध्ये चेहरा झाकून तिच्याकडे आली आणि जवळच्या बस स्टॉपचा रस्ता विचारला.

"सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...

उजाला यादव म्हणाली की, सोनमसोबत आणखी दोन जण होते. एका मुलाने पांढरा शर्ट घातला होता आणि त्याचा चेहरा झाकलेला होता. दुसऱ्या मुलानेही चेहरा लपवला होता. उजालालाही गाझीपूरमधील सैदपूर येथील तिच्या घरी जायचं होतं, तीही बस स्थानकावर पोहोचली. १० मिनिटांनी सोनमही गाझीपूरहून गोरखपूरला जाणाऱ्या बसमध्ये चढली. 

"सोनम खूप घाबरलेली...", राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवी एन्ट्री; कोण आहे उजाला यादव?

सोनमला रात्रभर प्रवास करून गोरखपूरला पोहोचायचं होतं. तिच्याकडे पैसे होते ज्यातून तिने वाराणसी ते गोरखपूरचे तिकीटही बुक केलं. कुटुंबाशी बोलण्यासाठी सोनमने उजालाचा फोन मागितला, नंबर टाइप केला पण कॉल लावला नाही. तिने उजालाच्या फोनवरून नंबरही डिलीट केला. संपूर्ण प्रवासात सोनम आपली ओळख लपवण्यासाठी खबरदारी घेत होती. सध्या सोनमची चौकशी सुरू आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस