कुंदन पाटील -
जळगाव : येथील अजिंठा चौफुलीवर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत वृद्धेच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र व पोत अज्ञात चोरट्यांची ओरबडल्याची घटना दि.१५ रोजी घडली. यासंदर्भात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालतीबाई सुखदेव देशमुख (वय ६०, कासमवाडी, जळगाव) असे या फिर्यादी महिलेचे नाव आहे. त्या दि.१५ रोजी सायंकाळी पाच वाजता शेगाव जाण्यासाठी बसमध्ये चढत होत्या. बसमध्ये चढताना झालेल्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेचे मंगळसुत्र व सोनपोत चोरली. ही बाब बसमध्ये चढल्यानंतर लक्षात आली. त्यानंतर मालतीबाईंनी सोनपोतची शोधाशोध केली. मात्र काहीही फायदा झाला नाही. मालतीबाई देशमुख यांनी दोन दिवसांनंतर शुक्रवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन १० ग्रॅमचे मंगळसूत्र व पाच ग्रॅमची सोन्याची पोत असा एकूण ४० हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक इमरान सैय्यद हे करीत आहेत.