बसमध्ये चढतांना दोन महिलांची सोनपोत केली लंपास; दोंडाईचा येथील घटना

By अतुल जोशी | Updated: March 29, 2023 16:11 IST2023-03-29T16:10:55+5:302023-03-29T16:11:20+5:30

अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल, याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॅान्स्टेबल हेमंत पाटील करीत आहेत.

While boarding the bus, gold of two women was trampled; Incident at Dondaicha | बसमध्ये चढतांना दोन महिलांची सोनपोत केली लंपास; दोंडाईचा येथील घटना

बसमध्ये चढतांना दोन महिलांची सोनपोत केली लंपास; दोंडाईचा येथील घटना

धुळे : बसमध्ये चढत असताना दोन महिलांची सोन्याची पोत चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दोंडाईचा बसस्थानकात ही घटना घडली.याप्रकरणी मंगळवारी दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सपना किरण धनगर (२१, रा. अशोकनगर रेणूका माता चौक नाशिक ह.मु. राणीपुरा होळीचौक, दोंडाईचा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्या दोंडाईचा बसस्थानकावर दोंडाईचा ते धुळे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन गळ्यातील दोन तोळे वजनाची ६० हजार रूपये किमतीची सोनपोत लंपास केली. याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हेड कॅान्स्टेबल हेमंत पाटील करीत आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या एका घटनेत दोंडाईचा - अमळनेर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चार ग्रॅम वजनाची सोनपोत चोरट्याने लंपास केली. दोंडाईचा बसस्थानकात दुपारी दिड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गुलाबकौरबाई कोमलसिंग गिरासे (५६) रा. धमाणे ता. शिंदखेडा यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार दोंडाईचा पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस हेड कॅान्स्टेबल निंबाळे हे करीत आहेत.

Web Title: While boarding the bus, gold of two women was trampled; Incident at Dondaicha