शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

40 हजाराची लाच घेताना सहाय्यक संचालकास किशोर गिरोल्ला रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 20:56 IST

अलिबाग तालुक्यांतील म्हात्रोळी गावांतील बांधकांमास भोगवटा दाखल्याकरीता आवश्यक अभिप्राय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सरकारी कामाकरिता सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांने या बांधकामाचे बांधकाम संल्लागार यांच्याकडे आज 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

जयंत धुळप

अलिबाग - येथील रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यास त्याच्या येथील नगररचना कार्यालयातील केबीनमध्ये 40 हजार रुपयांची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक किरण बकाले यांच्या पथकाने सापळा रचून आज संध्याकाळी साडेपाच वाजता रंगेहाथ अटक केली आहे.

अलिबाग तालुक्यांतील म्हात्रोळी गावांतील बांधकांमास भोगवटा दाखल्याकरीता आवश्यक अभिप्राय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सरकारी कामाकरिता सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांने या बांधकामाचे बांधकाम संल्लागार यांच्याकडे आज 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी केल्यानंतर लाचेची रक्कम 40 हजार रुपये ठरविण्यात आली. बांधकाम सल्लागार यांनी तत्काळ रायगड लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जावून या बाबत रितसर तक्रार दाखल केली. तक्रारी बाबत तत्काळ खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरक्षक किरण बकाले यांच्या पथकाने नगररचना कार्यालयात आणि गिरोल्ला याच्या केबीन सापळा रचून त्यास ४० हजार रुपयांची लाच घेताना शिताफीने अटक केली आहे. सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस निरक्षक किरण बकाले हे करित आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागArrestअटकalibaugअलिबाग