शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

दुबईतील ‘ती’ बॅग गेली कुणीकडे? पोलिसांचा मुंबई ते दुबई तपास, चौघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:28 IST

आग्रीपाडा पोलिसांकडून सध्या ‘या’ बॅगेचे गूढ उलगडण्यासाठी तपासचक्र सुरू झाले आहे. आग्रीपाडा परिसरात पीडित कुटुंब राहते. कुटुंबातील १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेर, जावेद, सय्यद पापा उर्फ काफिया आणि समीना या चौघांविरोधात विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मनीषा म्हात्रे -

मुंबई : दुबईवरूनमुंबईत होणाऱ्या सोन्याच्या तस्करीला ब्रेक लावण्यासाठी विमानतळावर कडेकोट यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. त्यातच दुबई विमानतळावर एका प्रवाशाला बॅग सोपवून ती मुंबईत नेण्याची जबाबदारी देण्यात आली. पैशांच्या आमिषाला बळी पडून त्यानेही बॅग पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र, विमानतळावरील सुरक्षा बघून त्याने, बॅग तेथेच सोडून मुंबईत पळ काढला. मात्र, तो मुंबईत आल्यानंतर बॅगेसाठी त्याला धमकाविण्यास सुरुवात झाली. त्याच्या कुटुंबीयांनाही धमकाविले जात असल्याने अखेर त्याने पोलिसांत धाव घेतली.  आग्रीपाडा पोलिसांकडून सध्या ‘या’ बॅगेचे गूढ उलगडण्यासाठी तपासचक्र सुरू झाले आहे. आग्रीपाडा परिसरात पीडित कुटुंब राहते. कुटुंबातील १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उमेर, जावेद, सय्यद पापा उर्फ काफिया आणि समीना या चौघांविरोधात विनयभंगासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी तिचे वडील दुबईला गेले होते. परत येताना त्यांना काही लोकांनी दुबई विमानतळावर एक बॅग दिली होती. मात्र, तेथील सुरक्षा यंत्रणा बघून घाबरल्याने ती बॅग विमानतळावरच सोडून ते मुंबईमध्ये परतले. ही बाब त्यांनी घरी आल्यानंतर सांगितली. त्यानंतर, १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान चौघांकडून त्यांच्या राहत्या घरासह आजी- आजोबांच्या घरी तसेच रस्त्यात अडवून  धमक्या सुरू झाल्या. पैशांची मागणी सुरू झाली. या धमक्यांमुळे वडील लपून राहत आहेत.चौघांनी मुलीला वाटेत अडवले. तिचे केस ओढून, ‘डॅडी को सोना लेके हाजीर होने के लिए बोलो, नहीं तो आप को उठवाके जान से मार देगें’, अशी धमकी दिली. तसेच, काफिया याने त्यांच्या वडिलांचा फोटो वापरून त्याखाली सोना लेके फरार, असा व्हॉट्सॲप संदेश ग्रुपमध्ये पाठवून त्यांच्या वडिलांची बदनामी करण्यास सुरुवात केल्याचेही मुलीने तक्रारीत नमूद केले आहे.दरम्यान, याप्रकरणी कसून तपास सुरु असून लवकरच या संपूर्ण घटनेचा उलगडा होईल अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. नेमके काय उघड होते याकडे लक्ष लागले आहे.

बॅगेचे गूढ... गुन्हा नोंदवत चारही आरोपींचा शोध सुरू केला आहे. नेमकी बॅग कोणी दिली? तिचे काय झाले? याबाबत अधिक तपास सुरू आहे. तक्रारदाराच्या वडिलांकडेही बॅगेबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या तरी बॅगेचे गूढ कायम आहे.- योगेंद्र पाचे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, आग्रीपाडा पोलिस ठाणे

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईDubaiदुबईPoliceपोलिस