शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेतील बेपत्ता १०० महिला आता आहेत कुठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 14:22 IST

वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरातील गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडून शोध सुरू नातेवाईकांची उडालीय झोप

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : १७ जुलैपासून दहा महिन्यांच्या बाळासह बेपत्ता झालेल्या पत्नीचा तपास न लागल्याने सुरक्षारक्षक पती रामराव घुले यांनी  औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे प्रकरण ताजे असतानाच शहराच्या वेगवेगळ्या भागांतून चार वर्षांत बेपत्ता १०० महिलांचा शोध लावण्यात अद्यापही पोलिसांना यश आले नाही. या महिला, तरुणी कोठे असतील आणि त्यांची काय अवस्था असेल, या चिंतेने नातेवाईकांची झोप उडाली आहे.

शहराची लोकसंख्या पंधरा लाखांहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच शहरातील गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. मात्र, गुन्हे कमी होत नसल्याचे दिसून येते. विशेषत: महिला, तरुणी घरातून निघून जाण्याचे अथवा त्यांना पळवून नेण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढतच असल्याचे दिसून येते. चार वर्षांच्या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या ४८९ महिला वेगवेगळ्या कारणाने बेपत्ता झाल्या होत्या.

यातील सर्वाधिक महिला एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहेत. याविषयी तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून तपास करून महिलांची शोध प्रक्रिया सुरू होते. बऱ्याचदा तपास करूनही बेपत्ता महिलांचा पोलिसांना शोध लागत नाही. २०१६ साली शहरातील ९६ महिला बेपत्ता झाल्या होत्या. यापैकी ६९ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. २०१७ साली बेपत्ता १३७ महिलांपैकी २० महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. २०१८ साली शहरातून गायब झालेल्या १३० महिलांपैकी १७ महिलांचा थांगपत्ता नाही, तर चालू वर्षी नोव्हेंबरपर्यंत १२६ महिला बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या. यातील ९३ महिलांचा शोध लागला, तर उर्वरित ३३ महिला मिळाल्या नाहीत. बेपत्ता झालेल्या १०० महिला कोठे असतील, काय करीत असतील, त्यांना कोणी डांबून ठेवले तर नसेल ना, यासह अनेक प्रश्नांमुळे त्यांच्या नातेवाईकांना झोप येत नाही.

पोलिसांचे उत्तर : तपास सुरू आहेउस्मानपुरा परिसरातील सुरक्षारक्षक रामराव घुले यांची पत्नी १७ जुलै रोजी दहा महिन्यांच्या चिमुकल्यासह बेपत्ता झाली. यानंतर त्यांनी लगेच उस्मानपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रार दाखल केल्यापासून ते आजपर्यंत आपल्या पत्नीसह बाळाचा तपास लागला काय, हे विचारण्यासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवीत आहेत. तपास सुरू आहे, एवढेच उत्तर त्यांना मिळते. यामुळे शेवटी त्यांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरेंमार्फत खंडपीठात धाव घेतली. या प्रकरणावर आता २ जानेवारी रोजी सुनावणी आहे. या घटनेमुळे शहरातील बेपत्ता झालेल्या महिलांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

२०१६ ९६ महिला बेपत्ता६९ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश२०१७१३७ महिला बेपत्ता२0 महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही२०१८१३0 महिला बेपत्ता१७ महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही२०१९१२६ महिला बेपत्ता९३ महिलांचा शोध लागला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणंWomenमहिलाAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस