शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! व्हाट्सअप ऍडमिनचा सदस्य महिलेवर बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 21:09 IST

Whats app Admin Rape on Women : सीबीडी मधील प्रकार : फोटो सोशल मीडियावर पसरवण्याची धमकी 

नवी मुंबई : व्हाट्सअप ग्रुपवरून झालेल्या ओळखीतून महिलेचा विश्वास संपादन करून बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला सीबीडी पोलिसांनी अटक केली आहे. बापू पाटील असे त्याचे नाव असून तो सोलापूरचा राहणारा आहे. त्याने सदर महिलेची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. (Whats app Admin Rape on Women in CBD Belapur)

गतमहिन्यात सीबीडी पोलिसठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. उलवे परिसरात राहणाऱ्या एका महिलेवर सीबीडी येथील हॉटेलमध्ये बलात्कार झाला होता. सोलापूर येथे राहणाऱ्या बापू पाटील याने वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन नावाचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. उलवेतील एका महिलेला देखील या ग्रुपची सदस्य बनवून, ग्रुपवर येणाऱ्या पोस्ट इतर सोशल मिडीयावर पसरवण्याचे सांगण्यात आले होते. यादरम्यान ग्रुपचा ऍडमिन बापू पाटील याने सदर महिलेसोबत जवळीक वाढवली होती. यातूनच त्याने काही महिन्यांपूर्वी तातडीचे काम असल्याचे सांगून तिच्याकडून ७५ हजार रुपये उसने घेतले होते. मात्र हे पैसे परत देण्यास तो टाळाटाळ करत होता. अखेर त्याने पैसे परत देण्याच्या बहाण्याने दोन महिन्यांपूर्वी या महिलेला सीबीडी येथील एका हॉटेलमध्ये बोलवले.

सदर हॉटेलमध्ये एक कॉन्फरन्स असल्याचे सांगून तिला त्याठिकाणी पैसे घेण्यासाठी यायला सांगितले. त्याठिकाणी खोलीमध्ये आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. शिवाय बापू पाटील याने तिच्या व्हाट्सअप हॅक करून तिचे इतरांसोबतचे संभाषण व खासगी फोटो चोरून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर तिने गतमहिन्यात सीबीडी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली असता बापू पाटील याला अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी सांगितले. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. 

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपMolestationविनयभंगPoliceपोलिस