शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

व्हेल माशाची दोन कोटींची उलटी जप्त; आरोपींना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:54 IST

Whale vomit worth Rs 2 crore seized : दुकलीविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम २,३९,४४,४८ (अ) ,४९ (ब),५७,५१ अन्वेय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली.

ठाणे : अतिशय दुर्मिळ समजली जाणारी व्हेल माशाची वांती/उलटी बेकायदेशीररित्या स्वत:जवळ बाळगून ती विक्रीसाठी आलेल्या एका दुकलीच्या श्रीनगर पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. त्यांच्याकडून दोन कोटीहुंन अधिक रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  त्या दुकलीला येत्या १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील रोड नंबर १६ येथील साउथ कोस्ट हॉटेल येथे मोटार सायकलीवरून दोघेजण व्हेल माशाची उलटी हे अनिधकृतरित्या जवळ बाळगुण विक्रीसाठी येत असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण तांबे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून चारकोप,कांदिवलीच्या मयुर देवीदास मोरे (३१) आणि अहमदनगर, जामखेडच्या प्रदिप आण्णा मोरे (३४) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती केली असता, त्यांच्याकडील बॅगमध्ये असलेल्या प्लास्टीकच्या पिशवीमध्ये पिवळसर तांबट रंगाचे वेगवेगळ्या आकाराचे दगड सदृष्य वस्तु आढळून आल्या. त्याचे सुमारे ०२.०४८ कि. ग्रॅम वजन असून ती वस्तु ही व्हेल माशाची वांती/उलटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातही ती उलटी मध्यस्थीच्या मदतीने २ कोटी रुपयांना विक्रीसाठी घेवुन आल्याचे त्यांनी सांगितले. त्या व्हेल माशाच्या उलटीसह दोन मोबाईल फोन आणि मोटारसायकल असा दोन कोटी २२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्या दुकलीविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात वन्य प्राणी संरक्षण कायदा १९७२ चे कलम २,३९,४४,४८ (अ) ,४९ (ब),५७,५१ अन्वेय गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक केली. त्या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

काय आहे अंबरग्रीस?व्हेल माशाच्या उलटीतून तयार होणाऱ्या दगडास अंबरग्रीस असे म्हटले जाते. अंबरग्रीसचा लहानसा खडाही शर्टावर चोळल्यास त्यातून निघणारा सुगंध महिनाभर टिकतो. परदेशातील सिगारेटमध्येही सुंगधासाठी अंबरग्रीसचा वापर होतो. त्यामुळे परदेशात अंबरग्रीसला मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून या अंबरग्रीसच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेPoliceपोलिसArrestअटक