शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईने सहकारी अल्पवयीन मुलीला घरी बोलावले, मुलाने 3 दिवस केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 16:39 IST

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्युटी पार्लरमध्ये सोबत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून बेशुद्ध करुन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्युटी पार्लरमध्ये सोबत काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरी बोलावून बेशुद्ध करुन बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी एका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची, तिथे आरोपीची आई देखील काम करते. कालीपूजेच्या रात्री त्या महिलेने मुलीला जेवायला बोलावले. यावेळी जेवणात बेशुद्धीचे काही औषध मिसळण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर अल्पवयीन बेशुद्ध पडली. यावेळी त्या महिलेच्या मुलाने मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने 16 डिसेंबर रोजी हरिदाबपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याच्या आईला अटक केली आहे. हरिदेवपूर येथे ही खळबळजनक घटना घडली. आरोपी आईचे नाव अनुश्री कोठारी आणि मुलाचे नाव कुणाल कोठारी आहे.

आधी पत्नीसोबत भांडला, नंतर 2 वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून खाली फेकले अन् स्वतः उडी मारली!

16 डिसेंबर रोजी हरिदबपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. 24 तारखेला काली पूजेच्या रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या पार्लरमधील सहकाऱ्याच्या घरी गेली होती. तिथे तिला खायला दिल्याचा आरोप आहे. यानंतर ती मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर महिलेच्या 18 वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 

घरच्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी हरिदेवपूर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 120B गुन्हेगारी कट, 328 अन्नात भेसळ, POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुणाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याच्या आईलाही अटक करण्यात आली. ही घटना समोर आल्यानंतर कोलकात्यात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस