शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

West Bengal Election: भाजपा खासदाराच्या घराजवळ जोरदार बॉम्बफेक; बालकासह तीन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 08:29 IST

West Bengal Assembly Election 2021: भाजपाचे खासदार अर्जुन सिंह यांचे निवासस्थान उत्तर 24 परगनाच्या जगदलमध्ये आहे.जगदलच्या भागात बुधवारी रात्री 18 नंबरच्या गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. जवळपास १५ बॉम्ब फेकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक (West Bengal Election 2021) आठ टप्प्यांत घेतली जात आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंसेच्या घटना वाढू लागल्या आहेत. भाजपाच्या (BJP) कार्यकर्त्यांनीच पक्षाच्या कार्यालय आणि नेत्यांवर काल दगडफेक केल्याची घटना घडली होती. आता भाजपाच्या खासदाराच्या (BJP MP)  घराजवळ क्रूड बॉम्बद्वारे हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये एका लहान मुलासह 3 जण जखमी झाले आहेत. भाजपा या हल्ल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार आहे. (Bombs have been hurled at around 15 places & CCTV cameras installed by police have been broken.)

भाजपाचे खासदार अर्जुन सिंह यांचे निवासस्थान उत्तर 24 परगनाच्या जगदलमध्ये आहे.जगदलच्या भागात बुधवारी रात्री 18 नंबरच्या गल्लीमध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये तीनजण जखमी झाले आहेत. हे ठिकाण बैरकपूरचे खासदार अर्जुन सिंह यांच्या घरापासून जवळच आहे. जवळपास 15 ठिकाणी बॉम्ब फेकण्यात आले. पोलिसांनी लावलेले सीसीटीव्ही देखील हल्लेखोरांनी तोडले आहेत. एसीपी ए पी चौधरी यांनी एएनआय़ला सांगितले की,  या बॉम्बफेकीमध्ये एक लहान मुलासह तीन जण जखमी झाले आहेत. 

भाजपा खासदाराच्या घराजवळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर बॉम्बफेक झाल्याने भाजपाचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले की, टीएमसी म्हणजे हिंसाचाराची राजनिती आहे. आचार संहिता लागू होताच बंगालमध्ये बॉम्बफेक, गोळ्या झाडल्या जात आहेत. निवडणूक आयोगाने हे इशारा म्हणून घ्यावे, नाहीतर मतदान शांततेत होण्याची शक्यता नाही. 

पोलिसांवर खासदार संतापलेकाही अज्ञात लोकांनी 17 नंबरच्या गल्लीमध्ये बॉम्ब फेकले. मात्र, ते बॉम्ब 18 नंबरच्या गल्लीमध्ये पडले. बुधवारी सायंकाळी ही बॉम्बफेक करण्यात आली. यामुळे स्थानिकांमध्ये भयाचे वातावरण आहे. जगदल पोलीस घटनास्थळी पोहोचली असून स्थानिक लोकांनी पोलिसांसमोर संताप व्यक्त केला. एक बॉम्ब पोलिसांच्या समोरच पडल्याचे सांगण्यात आले. ही घटना समजताच प्रचारावर असलेले भाजपाचे खासदार अर्जुन सिंह घरी आले. त्यांनी पोलिसांना खडेबोल सुनावले. तसेच तुमच्याने काही होत नसेल तर इथून निघून जावे, असेही सांगितले. 

गेल्या दहा, बारा दिवसांपासून आम्ही पोलिसांना सूचना दिली होती. मात्र, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. आम्ही निवडणूक आयोगालाही सांगितले आहे. आता पुन्हा बॉम्बफेक झाली आहे. पोलिस सत्ताधाऱ्यांच्या आदेशावर काम करत असल्याने ते काहीच करत नाहीएत, असा आरोप खासदारांनी केला. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाBombsस्फोटकेtmcठाणे महापालिका