शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल वाचवायला गेला अन् ४८ वाहनांचा चुराडा; अपघाताचे कारण पुढे, ट्रकचे ब्रेक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 14:15 IST

या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.

पुणे : आंध्र प्रदेशच्या ट्रकचालकाने इंधन वाचविण्यासाठी उतारावर ट्रकचे इंजिन बंद करून गाडी न्यूट्रलवर चालविण्याचा प्रयत्न केला. तीव्र उतारामुळे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने एकापाठोपाठ पुढील ४८ वाहनांना धडक दिल्याचे तपासणीत आढळले आहे.

रविवारी रात्री हा अपघात झाला होता. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी केलेल्या तपासणीनंतर ही माहिती समोर आली.  उतार असल्याने डिझेल वाचविण्याच्या उद्देशाने चालकाने इंजिन बंद केले आणि गाडी न्यूट्रल गिअरमध्ये घेऊन तो गाडी घेऊन बिनधास्त निघाला होता. परंतु वेग प्रचंड वाढला आणि नियंत्रण सुटून वेळेत ब्रेक दाबता न आल्याने हा अपघात घडला. 

या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिस चालकाचा शोध घेत आहेत. मणिराम छोटेलाल यादव असे चालकाचे नाव असून, तो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सिंहगड रस्ता विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार यांनी दिली. 

टॅग्स :AccidentअपघातAndhra Pradeshआंध्र प्रदेशPoliceपोलिस