शाब्बास! हरवलेल्या मुलाला रेल्वे पोलिसांनी अवघ्या ३ मिनिटात काढले शोधून

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 02:10 PM2020-10-31T14:10:42+5:302020-10-31T14:11:15+5:30

Missing And Found : पालघर येथे राहणारे राजेश त्रिपाठी हे त्यांचा 13 वर्षाचा मुलगा त्यांच्यावर रागावला. कारण मुलगा अभ्यास करीत नव्हता. वडिल रागावल्याने मुलाने डोक्यात राग घेतला.

Well done! The missing child was found by the railway police in just 3 minutes | शाब्बास! हरवलेल्या मुलाला रेल्वे पोलिसांनी अवघ्या ३ मिनिटात काढले शोधून

शाब्बास! हरवलेल्या मुलाला रेल्वे पोलिसांनी अवघ्या ३ मिनिटात काढले शोधून

googlenewsNext
ठळक मुद्दे पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. हरवलेला मुलगा पोलिसांनी तीन मिनिटाच शोधून काढला. त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

कल्याण - अभ्यास करीत नाही या कारणावरुन वडिल मुलावर रागवले होते. मुलाने घर सोडले. तो बाहेर पडला. मात्र तो एका रेल्वे गाडीने कुठे तरी चालला आहे. या माहितीच्या आधारे कल्याणरेल्वेपोलिसांनी अवघ्या तीनच मिनिटात मुलाचा शोध घेतला असून त्याला त्याच्या पालकांच्या हवाली केले आहे.


पालघर येथे राहणारे राजेश त्रिपाठी हे त्यांचा 13 वर्षाचा मुलगा त्यांच्यावर रागावला. कारण मुलगा अभ्यास करीत नव्हता. वडिल रागावल्याने मुलाने डोक्यात राग घेतला. तो घराबाहेर पडला. त्याने तडक पालघर रेल्वे स्थानक गाठले. तो रेल्वे गाडीने कुठे तरी गेल्याची माहिती त्याच्या वडिलांना लागली होती. अधिक माहिती घेतली असता तो अजमेर म्हैसूर गाडीने कुठे तरी जात असल्याचे कळाले. त्याच्या वडिलांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी ही माहिती रेल्वे पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिस नियंत्रण कक्षातून हा मेसेज कल्याण रेल्वे पोलिसांना पास झाला. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी त्यांच्या पथकाला मुलाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. अजमेर म्हैसूर ही गाडी कल्याण रेल्वे स्थानकात येण्यास अवघी दहा मिनिटेच बाकी होती. दहा मिनिटांत गाडी येण्यापूर्वीच मुलाच्या वडिलांनी मुलाचा Whats Appवर पाठविलेला फोटो पोलिसांना मिळाला होता. पोलीस अधिकारी डी. आर. साळवे यांनी हा फोटो घेऊन पोलिस पथकाने कल्याण स्थानकात अजमेर म्हैसूर ही गाडी येताच गाडीचा ताबा घेतला. गाडीत शोध सुरु केला. गाडीच्या एका डब्यात हरवलेला मुलगा मिळून आला. त्याला पोलिसांनी हटकले असता तो एकटा नसून त्याच्यासोबत त्याचे काका असल्याचे सांगितले. मात्र पोलिसांकडे त्याचा फोटा असल्याने पोलिसांची खात्री पटली की हाच तो मुलगा आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे. हरवलेला मुलगा पोलिसांनी तीन मिनिटाच शोधून काढला. त्यामुळे पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Web Title: Well done! The missing child was found by the railway police in just 3 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.