शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

शाब्बास पोलिसांनो! दरोड्याचा कट उधळत चौघांना केली अटक; घातक शस्त्रे जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2021 14:51 IST

Dacoity Plan Busted :पोलिसांच्या हाती लागलेले आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, लूटमार तसेच हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.

ठळक मुद्देयशोधरानगर पोलिसांचे पथक बुधवारी मध्यरात्री संत नामदेव नगरात गस्त करीत असताना नाल्याजवळ त्यांना काही आरोपी संशयास्पद अवस्थेत दिसले.

नागपूर : ज्वेलर्स लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार सशस्त्र गुंडांना यशोधरानगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. शेख सुलतान शेख मोहम्मद (वय २४, रा. संघर्ष नगर ), शेख वजीर शेख याकूब (वय २३, रा. संघर्ष नगर), शुभम उर्फ चुक्का छोटेलाल बिरहा (वय २६, रा. संतोषनगर) आणि दशरथ उर्फ गुस नरोत्तम शाहू (वय २३,रा. गरीब नवाज नगर) अशी अटक करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत.

यशोधरानगर पोलिसांचे पथक बुधवारी मध्यरात्री संत नामदेव नगरात गस्त करीत असताना नाल्याजवळ त्यांना काही आरोपी संशयास्पद अवस्थेत दिसले. पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेऊन उपरोक्त चौघांना पकडले. त्यांच्याकडून एक छऱ्याची बंदूक, तीन तलवारी, मिरची पावडर आणि नायलॉन दोरी जप्त करण्यात आली. त्यांची चौकशी केली असता उपरोक्त आरोपी या परिसरातील एक ज्वेलर्सचे दुकान तसेच एटीएम फोडण्याच्या तयारीत होते, अशी माहिती आरोपींनी दिली. आरोपीचे दोन साथीदार फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार 

पोलिसांच्या हाती लागलेले आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध चोरी, घरफोडी, लूटमार तसेच हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.

 

टॅग्स :DacoityदरोडाnagpurनागपूरPoliceपोलिस