शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! कोरोनाने मृत्यू झालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 21:04 IST

Robbery Case : कोविड रुग्णालयातील घटना, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देयाप्रकरणी मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

अमरावती : कोरोनाने मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील २२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात आरोपीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. सदर घटना सुपर स्पेशालिटी कोविड हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

पोलीससूत्रानुसार, अंजनगाव बारी येथील फिर्यादी २० वर्षीय मुलाने पोलिसांत तक्रार नोंदविली. फिर्यादी यांची ६४ वर्षीय आईचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ३ मे रोजी सुपर स्पेशालिटीच्या कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, उपचारदरम्यान २० मे रोजी त्या दगावल्या. त्यामुळे त्यांचे प्रेत अंत्यविधीकरिता नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, मृताच्या गळ्यात २२ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र नातेवाईकाच्या ताब्यात दिले नाही. त्यामुळे नातेवाईक संतापले सदर मंगळसूत्र अज्ञात आरोपीने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी भादंविचे कलम ४०४, ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला. यापूर्वीसुद्धा कोविड रुग्णालयातून मोबाईल, बॅग व इतर साहित्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, आता मृताच्या गळ्यातील मंगळसूत्रच लंपास केल्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे.

कोविड रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येतील. अशाप्रकारे चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल. - आसाराम चोरमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गाडगेनगर

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसAmravatiअमरावतीcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू