शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अक्षता पडणार तोच नवरीचा प्रियकराने घातला धुमाकूळ, नवरदेव गेला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 17:54 IST

Crime News : जुना उमरसरा परिसरातील घटना 

ठळक मुद्देनांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील नवरदेव आपल्या वऱ्हाडासह वधू मंडपात दाखल झाला.

यवतमाळ : आई-वडिलांच्या पसंतीने मुला-मुलीचे लग्न जुळविण्यात आले. लग्नाचा मुहूर्त ठरला. रविवारी सायंकाळी जुना उमरसरा परिसरातील यशोधरा मराठी शाळेत लग्न सोहळा सुरू झाला. दोन्ही बाजूंकडील मंडळी उत्साहाने आशीर्वाद देण्यासाठी जमली. नववधूवरांच्या डोक्यावर आशीर्वादाच्या अक्षता पडणार तोच नवरीचा प्रियकर तेथे दाखल झाला. अचानक काय घडतेय हे वऱ्हाडी मंडळीच्या लक्षात आले नाही. एकच गोंधळ उडाला. 

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील नवरदेव आपल्या वऱ्हाडासह वधू मंडपात दाखल झाला. मुलगीही आई-वडिलांच्या पसंतीनेच लग्न करण्यास तयार होती. लग्नविधी सुरू असतानाच मुलीचा प्रियकर तेथे आला. त्याने माझे हिच्यावर प्रेम आहे, मीच हिच्याशी लग्न करणार असे म्हणत नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींना धमकावणे सुरू केले. हा गोंधळ सुरू झाल्याचे पाहून नवरदेवाने थेट अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. लग्नातील भेटवस्तूसह इतर कुठलेच साहित्य न घेता आम्ही वरात घेऊन परत जात असल्याचा अर्ज पोलिसांना दिला. 

हा धक्का सहन न झाल्याने नववधूची प्रकृती बिघडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात जन्माचे ऋणानुबंध जुळत असतानाच क्षणार्धात ते तुटले. वधू पित्यालाही या प्रकाराने नेमके काय होतेय हे कळले नाही. नवरदेवाकडील मंडळींच्या हातापाया जोडूनही ते थांबण्यास तयार नव्हते. गोंधळ घालून तो प्रियकर तेथून निघून गेला. वधू पित्यानेही पोलिसात अर्ज दिला आहे. या दोन्ही अर्जाची चौकशी अवधूतवाडी पोलीस करीत आहेत. प्रियकराच्या अचानक झालेल्या एन्ट्रीने लग्न सोहळा थांबवावा लागला.प्रियकर नात्यातीलच नववधूच्या नात्यातीलच प्रियकर असल्याचे सांगितले जाते. त्याची समजूत काढूनही तो मानण्यास तयार नव्हता. अखेर वराकडील मंडळींनी लग्नमंडपातून काढता पाय घेतला.

टॅग्स :marriageलग्नYavatmalयवतमाळPoliceपोलिस