शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

७० व्या वर्षी लग्नाची बेडी पडली महागात, होणारी वधू दागिने, घराची कागदपत्रे घेऊन पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 7:06 AM

इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. मनस्ताप झाला तो निराळाच.

- मनीषा म्हात्रेमुंबई : पत्नीच्या निधनानंतर आलेल्या एकटेपणाला कंटाळून तसेच आजारपणात सोबत हक्काची व्यक्ती हवी म्हणून वयाच्या ७० वर्षी एका आजोबांनी पुनश्च हरिओम करण्याचे ठरवले. आयुष्यावर आलेल्या एकटेपणाच्या लॉकडाऊनचे मळभ दूर करण्यासाठी आजोबांनी मित्राच्या मदतीने लग्नही जुळवले. परंतु, लग्नाच्या बेडीचे कायदेशीर सोपस्कार होण्याआधीच ४४ वर्षीय वधूने घरातील दीड लाख रुपये, दागिने आणि मालमत्तेची कागदपत्रे घेऊन पोबारा केला.इकडे दुसऱ्या लग्नामुळे सोबत मिळेल या आशेवर असलेल्या आजोबांना मंडपात फेरे घेण्याऐवजी पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या. त्यात त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. मनस्ताप झाला तो निराळाच.मूळचे राजस्थानचे असलेले आजोबा उत्तर मुंबईत राहतात. २०१८ मध्ये त्यांच्या पत्नीचे वृद्धापकाळाने निधन झाले. या दाम्पत्याला मूलबाळ नसल्याने आजोबा निराधार झाले. हृदयाचा, फुप्फुसाचा व किडनीचा आजार असल्याने त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागत होते. नातेवाईक दूर राहत असल्याने त्यांचीही काही मदत होत नव्हती. म्हणून मग मित्राच्या सल्ल्याने पुन्हा लग्न करण्याचे आजोबांनी ठरवले.त्याच्याच ओळखीतून जयपूर येथील ४४ वर्षीय घटस्फोटित महिलेचे स्थळ आले. आजोबांना स्थळ पसंत पडले. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ती महिला आईवडिलांसोबत घरी आली. मित्राने लगोलग लग्न उरकण्यास सांगितले. दुसºयाच दिवशी त्यांनी विवाह कार्यालय गाठले. तेथे काही कारणास्तव हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह झाला नाही. फक्त औपचारिकता पूर्ण करण्यात आली. राजस्थानात जाऊन कायदेशीर पद्धतीने विवाह करण्याचे ठरले. मग जीवाची मुंबई करायची म्हणून ते सगळे आजोबांच्या घरात थांबले. आजोबांनी चाव्या त्या बार्इंच्या हाती सोपवल्या. पुढे राजस्थानला जाऊन विवाह नोंदणीसाठी अर्ज केला. महिनाभराने त्या महिलेने आजोबांच्या गावी येत सर्व मालमत्ता पाहून घेतली.येथे मुंबईला परतलेल्या आजोबांना मालमत्तेची कागदपत्रे गायब असल्याचे लक्षात आले. अधिक शोधाशोध केली तर दीड लाख रुपये, लाखोंचे दागिनेही गायब झाल्याचे समजले. आजोबांनी चौकशीसाठी त्या महिलेला फोन केला. मात्र त्या बार्इंनी फोन घेतला नाही. तेव्हा आपली फसवणूक झाल्याची आजोबांची खात्री झाली. त्यांनी लगोलग पोलिसांकडे तक्रार केली.गुन्हा दाखलगेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यात ही फसवणूक झाली. पोलिसांनी या मंगळवारी गुन्हा दाखल केला. दीड लाख रुपयांसह दागिने आणि घराची कागदपत्रे असे एकूण २८ लाख २९ हजार रुपयांवर महिलेने डल्ला मारला. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांकड़ूनच अपेक्षा पोलिसांकड़ून तपास सुरू आहे. लवकरच कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त करत आजोबांनी अधिक काही बोलण्यास नकार दिला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नSenior Citizenज्येष्ठ नागरिक