शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकी महिलेच्या हत्येप्रकरणी चौकीदाराला जन्मठेप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:21 IST

माऊंट कारमेल स्कुल मधील चौकिदाराने (अण्णाजी तुकाराम सरदार) रागाच्या भरात स्वयंपाक बनविणारी महिला वनमाला भिमराव कांबळे (वय ४५) हिची १३ डिसेंबर २०१७ रोजी हत्या केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरापासून ५ कि़मी. अंतरावर असलेल्या माऊंट कारमेल स्कुल मधील चौकिदाराने (अण्णाजी तुकाराम सरदार) रागाच्या भरात स्वयंपाक बनविणारी महिला वनमाला भिमराव कांबळे (वय ४५) हिची १३ डिसेंबर २०१७ रोजी हत्या केली होती. या हत्येप्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश शशांक मनोहर मेनजोगे यांनी २० मे रोजी दिलेल्या निकालात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.सुरकंडी (ता.जि. वाशिम) येथील माऊंट कारमेल इंग्लीश स्कुलचे मुख्याध्यापक तथा फादर संजय वानखडे यांच्या निवासस्थानी स्वयंपाक बनविण्यासाठी वनमाला भिमराव कांबळे (रा. काकडदाती ता.जि. वाशिम) हि महिला सन २०१६ पासुन कामाला होती . तिच्याकडे स्वयंपाक गृहाची जबाबदारी देण्यात आली होती. याच शाळेतील चौकिदार अण्णाजी तुकाराम सरदार व त्यांचा मुलगा गुणाजी सरदार हे दोघे फादर वानखडे यांच्या ‘अपरोक्ष’ निवासस्थानातील खाण्यापिण्याच्या वस्तु व इतर सामानाचा वापर करीत होते. त्यामुळे वनमाला कांबळे ही अण्णाजी व त्यांचा मुलगा गुणाजी यांना वारंवार खाण्यापिण्याची वस्तू व ईतर सामान वापरण्यासाठी मनाई करीत होती. या कारणामुळे अण्णाजी व गुणा हे दोघे वनमाला हिचा नेहमीच राग करीत असत. वनमाला हिचे नेहमीचे ‘टोकने’ अण्णाजीच्या चांगलेच जिव्हारी लागले होते.नेमका हा राग मनामध्ये धरून १३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी चौकिदार अण्णाजी याने वनमाला ही घराच्या बाहेर एकटीच असल्याचे पाहून तिच्या डोक्यात कुºहाड मारून तिला ठार केले होते. या घटनेची वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये तत्कालीन मुख्याध्यानक संजय वानखडे यांनी फिर्याद नोंदविली. पोलिसांनी चौकिदार अण्णाजी तुकाराम सरदार (रा. वनारशी ता.जि. अमरावती) याचेविरूध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला.याप्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार सुनिल अंबुलकर व पोलीस उपनिरिक्षक अशोक जायभाये यांच्या पथकाने कसोशिने तपास केला. गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेले शस्त्र व ईतर पुराव्याच्या आधारावर न्यायाधिश शशांक मेनजोगे यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. चौकिदाराच्याच शिफारशीवर वनमाला होती कामाला !चौकिदार अण्णाजी सरदार व वनमाला कांबळे हे दोघे नातेवाईक आहेत. फादर वानखडे यांना स्वयंपाक करण्यासाठी ‘कुक’ ची आवश्यकता होती. अण्णाजी सरदार याने वनमाला कांबळे ही माझी नातेवाईक आहे. तिला स्वयंपाक चांगला करता येतो. तीला कामावर घेण्याची शिफारस चौकिदार सरदार यानेच केली होती. कालांतराने चौकिदार व वनमाला हिच्यामध्येच खटके उडल्याने चौकिदार सरदार याने तिची हत्या केली.

 

टॅग्स :washimवाशिमCourtन्यायालय