वाशिम : अज्ञात इसमांनी एका २४ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना २१ डिसेंबरला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास स्थानिक शिवाजी चौक परिसरात घडली. मृतकाचे नाव अ. वसीम अ. वजीद असे असून तो भवानी नगर परिसरातील रहिवाशी आहे.स्थानिक शिवाजी चौक परिसरातील एका सॉ मिल मागे असलेल्या मोबाईल टॉवर जवळील बाभळीच्या झाडाखाली अ. वसीम अ. वजीद याचा मृतदेह सोमवारी आढळून आला. प्रथमदर्शनी त्याची हत्या ही दगडाने किंवा ईतर अवजाराने ठेचून केल्याचे तपासातून समोर येत आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धृवास बावनकर, जमादार घुगे, धनंजय अरखराव, विठ्ठल महाले यांचेसह ठसा तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले.अ. वसीम याची हत्या का व कुणी केली याचा शोध पोलीस पथकातर्फे घेतला जात आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत.
वाशिम : युवकाची दगडाने ठेचून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 19:12 IST
Crime News २४ वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना २१ डिसेंबरला घडली.
वाशिम : युवकाची दगडाने ठेचून हत्या
ठळक मुद्दे मृतकाचे नाव अ. वसीम अ. वजीद असे असून तो भवानी नगर परिसरातील रहिवाशी आहे. हत्या का व कुणी केली याचा शोध पोलीस पथकातर्फे घेतला जात आहे.