शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Waris Pathan : वारिस पठाण यांच्या अडचणीत वाढ; चिथावणीखोर वक्तव्याविरोधात या पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 15:21 IST

Waris Pathan : गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत.

ठळक मुद्देपठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात संघर्ष या सामाजिक संस्थेने लेखी तक्रार दाखल केली आहे. संघर्ष या सामाजिक संस्थेचे पृथ्वीराज म्हस्के यांनी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), झोनचे १० चे पोलीस उपायुक्त यांना देखील देण्यात आली आहे.

मुंबई - एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या अडचणीत वाढ वाढ झाली असून त्यांनी 'आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू' हे केलेले चिथावणीखोर वक्तव्या त्यांना डोईजड होण्याची चिन्ह दिसत आहेत. पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात संघर्ष या सामाजिक संस्थेने लेखी तक्रार दाखल केली आहे. तसेच लेखी तक्रार संघर्ष या सामाजिक संस्थेचे पृथ्वीराज म्हस्के यांनी पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था), झोनचे १० चे पोलीस उपायुक्त यांना देखील देण्यात आली आहे.

 गेल्या काही दिवसांपासून देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात आंदोलनं सुरू आहेत. सीएए, एनआरसीविरोधात दिल्लीत असलेल्या शाहीन बागेत गेल्या दोन महिन्यांपासून मुस्लिम महिलांनी ठिय्या दिला आहे. यावरुन एमआयएमचे नेते आणि माजी आमदार वारिस पठाण यांनी मुस्लिमांना चिथावणी देणारं विधान केलं आहे. आम्ही १५ कोटी आहोत. पण १०० कोटींना भारी पडू, असं वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. यावरून संपूर्ण भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. तसेच हिंदू संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत.  भायखळ्याचे माजी आमदार असलेले वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केलं. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असं ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,' असं वादग्रस्त विधान पठाण यांनी केलं होतं. 

वारिस पठाणांच्या वक्तव्यावर दिग्विजय सिंह, तेजस्वी भडकले; अटकेची केली मागणी

वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वारिस पठाणांवर भडकले जावेद अख्तर; म्हणाले...

वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर विधानाचे मुंबईत उमटले तीव्र पडसाद

टॅग्स :Waris Pathanवारिस पठाणcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिसMumbaiमुंबई