शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा गर्भपात प्रकरण: मटका पट्टीसारखी बनवली जायची गर्भपाताची चिठ्ठी; अधिकृत रजिस्टर नावापुरते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 09:29 IST

सांकेतिक शब्द, अवैध गर्भपाताची नोंद नाही

- नरेश डोंगरेनागपूर : कायद्याला वेशीवर टांगून गर्भपात करणाऱ्या आर्वीतील डॉ. कदम हॉस्पिटलमध्ये अवैध गर्भपाताची नोंदच होत नव्हती. मटका (सट्टा) घेणारा जशी लावणाऱ्याला चिठ्ठी देतो, त्याचप्रमाणे सांकेतिक शब्दात अवैध गर्भपाताची एक चिठ्ठी तयार केली जात होती, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे.या अवैध गर्भपात प्रकरणाची लक्तरे ‘लोकमत’ने वेशीवर टांगल्यामुळे अनेक धक्कादायक बाबी उजेडात येत आहेत. एक म्हणजे अवैध गर्भपाताची डॉ. कदम नोंदच करत नव्हते. नोटांची गड्डी हातात पडताच डॉ. रेखा कदम कोणत्याही वयातील मुलीचे अथवा महिलेचा गर्भपात करण्यासाठी सज्ज व्हायच्या. कायद्यानुसार ज्या मुलीचे अथवा महिलेचा गर्भपात करायचा आहे, त्याची अधिकृत नोंद व्हायला पाहिजे. त्यासाठी किती पैसे आकारण्यात आले, त्याची पावतीही तयार व्हायला पाहिजे. मात्र, डॉ. कदम असे काहीही करत नव्हत्या. गल्लीबोळात सट्टापट्टीची नोंद करणारा मटका अड्डाचालक ज्याप्रकारे चिठ्ठ्या तयार करतो, तशी चिठ्ठी करून गर्भपाताचा हिशेब ठेवला जायचा. ज्या गर्भपातामुळे डॉ. कदम यांच्या पापाचा भंडाफोड झाला, त्या मुलीच्या गर्भपाताचीही रजिस्टरमध्ये नोंद नाही. पोलिसांना मटक्याच्या नोंदीसारख्या काही चिठ्ठ्या सापडल्या आहेत. त्या आकड्यांचा उलगडा करून घेण्यासाठी पोलीस कामी लागले आहेत.काही आरोग्य अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद? कदम हॉस्पिटलमधील पापात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ठळकपणे प्रकाशित केले होते. त्यावर शिक्कामोर्तब होऊ लागले आहे.सरकारी रुग्णालयात कार्यरत डॉ. नीरज कदम यांनी अवैध गर्भपात करण्यासाठी मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. आता नीरज आणि रेखा या  आरोपी डॉक्टर दाम्पत्याला आणखी कुणी मदत केली, तेसुद्धा लवकरच पुढे येईल.