शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2021 14:52 IST

Rape in Covid patient by Wardboy : . महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली.

ठळक मुद्दे ही घटना ६ एप्रिलची आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांनी बलात्काराच्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली नाही.

भोपाळ - कोरोनाच्या काळात अनेकजण चांगले कार्य करत आहेत, परंतु दुसरीकडे काही नराधम दुष्कृत्य करताना देखील आढळत आहेत. भोपाळ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोविड रुग्णासोबत वॉर्डबॉयने  धक्कादायक घटना घडवून आणली. वॉर्डबॉयने कोरोना रुग्णावर बलात्कार केला. बलात्कारानंतर महिलेची तब्येत खालावली आणि तिला व्हेंटिलेटरमध्ये हलविण्यात आले. दुर्दैवी गोष्ट म्हणजे दुसर्‍याच दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. कुटुंबियांना सर्वसामान्य कोरोना रुग्णाच्या मृत्यूप्रमाणे झाल्यासारखे धरून चालत होते. महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली.ही घटना ६ एप्रिलची आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांनी बलात्काराच्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली नाही. घरातील सदस्यांपासून बलात्काराचा विषय लपवताना पोलिसांनी आरोपी वॉर्ड बॉयला तुरूंगात पाठविले. संपूर्ण प्रकरण निशातपुरा परिसरात घडलेला आहे. आरोपी वॉर्डबॉयवर नर्सिंगच्या विद्यार्थ्याकडून बलात्कार केल्याचा आरोपही केला जात आहे.मीडिया रिपोर्टनुसार आरोपीने चेकअपच्या नावाखाली महिलेसोबत लैंगिकअत्याचार केले होते. तक्रारीत रुग्णालय व्यवस्थापनाकडे पोलिसांना तीच माहिती आहे. त्याचबरोबर पोलिस आणि रुग्णालयातील लोकांनी कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती का दिली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. सध्या ही लोकं मौन बाळगून राहिली  आहेत.

त्याचवेळी स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना या प्रकरणाचे तपास अधिकारी बनवारीलाल म्हणाले की, मी पीपीई किट परिधान केलेल्या महिलेचा जबाब घेण्यासाठी गेलो होतो. पण त्याची प्रकृती ठीक नव्हती, म्हणून मला त्यांचा जबाब घेता आला नाही. तपास अधिकाऱ्याने सांगितले की, टीआय साहेबांशी  बोलल्यानंतर ते त्या महिलेच्या कुटूंबाला माहिती देणार की नाही हे ठरवतील. या संपूर्ण वादावर रुग्णालय व्यवस्थापनाकडून त्यांची बाजू कळालेली नाही. विशेष म्हणजे वॉर्डबॉयच्या दुष्कर्मांमुळे मध्य प्रदेशातील बऱ्याच मोठ्या शहरांना लाजेने मान घालावी लागली आहे. ग्वाल्हेरमध्येही वॉर्डबॉयने बलात्काराचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी इंदौरमध्ये वॉर्डबॉयवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसArrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल