शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीडीए’साठी ‘वाण्टेड’ रितिकला भर पावसात उचलले, जळगाव LCBची पुण्यात कारवाई

By विजय.सैतवाल | Updated: July 9, 2024 00:33 IST

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात दाखल आहे गुन्हे

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: राज्यासह मध्यप्रदेशातील गुन्ह्यांमध्ये फरार असलेला तसेच एमपीडीए कारवाईसाठी पोलिसांना हवा असलेला सराईत गुन्हेगार योगेश उर्फ रितीक डिगंबर कोल्हे (३२, रा. असोदा, ता. जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुण्यातील थेरगाव येथून ताब्यात घेतले. नातेवाईकांकडे जात असतानाच भर पावसात त्याला पोलिसांनी उचलले.

जबरी चोरी, हाणामारीसह मध्यप्रदेशातील नेपानगर येथील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेला योगेश उर्फ रितीक कोल्हे याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश झाले होते. तेव्हापासून तो फरार होता. या संशयिताला ताब्यात घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिल्या. तो पुणे येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी जितेंद्र पाटील यांना मिळाली. त्यानुसार जितेंद्र पाटील यांच्यासह नितीन बाविस्कर, बबन पाटील व ईश्वर पाटील यांनी योगेश याला पिंपरी चिंचवड परिसरातील थेरगाव येथून ताब्यात घेतले.

नातेवाईक, मित्रांचा आधार

फरार असल्यापासून योगेश हा मित्र व नातेवाईकांकडे राहत होता. ७ जुलै रोजी पहाटे तो नातेवाईकांकडे जात असतानाच भरपावसामध्ये त्याला ताब्यात घेतले. त्याला जळगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी