शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Walmik Karad : वाल्मिक कराड पुण्यात शरण येण्याची शक्यता; CID मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:10 IST

Santosh Deshmukh Case Update: मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पुण्यात मोठ्या हालचाली घडू लागल्या आहेत.

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून धनंजय मुंडे समर्थकही जमू लागले आहेत. 

मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी सीआयडीने मोठी कारवाई केली आहे. सीआयडीने सर्व आरोपींची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली आहे. या हत्येच्या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत आहे. अशातच भाजपाचे आमदार सुरेश धस हे मुंडेंवर वेगवेगळे खुलासे करत असून विरोधकांनीही मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंडे यांच्यात बैठक झाली असून यात कराडच्या शरण येण्यावर निर्णय झाल्याचे समजते आहे. 

वाल्मिक कराड आज पुण्यात शरण येणार असल्याची शक्यता असून यामुळे CID मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. CID ची पथके मागील पंधरा दिवसापासून वाल्मिकी कराड यांचा शोध घेत आहेत. परंतू तो त्यांना सापडू शकला नव्हता. वाल्मिक कराडच्या शेवटच्या लोकेशनबाबत मोठी अपडेट समोर आली होती. कराड याचे शेवटचे लोकेशन मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये होते, यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे समोर आले आहे. परंतू, तो त्याच्या आकांसोबत टचमध्ये असल्याचा दावा धस यांनी केला होता. सरेंडर करण्यावरून या दोघांमध्ये वादही झाल्याचे ते म्हणाले होते. 

दरम्यान, देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन आठवडे पूर्ण झाल्यानंतरही या प्रकरणातील तीन आरोपी फरार असल्याने देशमुख कुटुंबासह सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बीडपोलिसांकडून या घटनेचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्यानंतर या तपासाची स्थिती काय आहे, याची माहिती घेण्यासाठी मृत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.  

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेPoliceपोलिसwalmik karadवाल्मिक कराड