शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक

By नरेश डोंगरे | Updated: April 28, 2025 23:24 IST

हाऊस किपिंगची सेवा देणाऱ्यांचा गोरखधंदा

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे गाड्यांमध्ये हाऊस किपिंगची सेवा देणाऱ्यांकडून सिटसाठी धावपळ करणाऱ्या वेटिंगवरील प्रवाशांना चक्क लिनन बॉक्स (चादर, ब्लँकेट ठेवण्याची जागा) मध्ये बसवून प्रवास घडविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या कारवाईमुळे गैरप्रकार करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलपासून एक विशेष तपासणी मोहिम राबविली जात आहे. विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य तसेच विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक राजीव रंजन तसेच कविता नरेंद्र सिंग यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या या तपासणी मोहिमत प्रत्येक कोचमध्ये संशयीत व्यक्ती आणि प्रतिबंधित सामानाची कसून तपासणी केली जात आहे.

या स्टाफला एका गाडीत काही प्रवासी जेथे चादर, ब्लँकेट ठेवले जाते त्या 'लिनन बॉक्स' मध्ये बसून प्रवास करताना आढळले. त्यांची चाैकशी केली असता त्यांच्याकडे वेटिंग तिकिट आढळले. ऑन बाेर्ड हाउस कीपिंग सर्व्हीस (ओबीएसएस) आणि पेंट्रीकार सर्व्हीस देणारे रेल्वे गाड्यांमधील कर्मचारी अशा वेटिंगवर असणाऱ्या आणि सिटच्या शोधात असणाऱ्या प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना लिनन बॉक्स मध्ये बसवत असल्याचे उघड झाले. हा गैरप्रकार करणाऱ्या ओबीएचएसच्या ६ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रेल्वे प्रशासनात एकच खळबळ निर्माण झाली आहे.

सामानाचीही अवैध वाहतूक

या प्रवाशांसोबत काही जण प्रतिबंधित सामानाची अवैध वाहतूक करीत असल्याचेही स्पष्ट झाले. याच तपासणीत ४५३ फुकटे प्रवासीही आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख, ७८ हजार, ८२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यांना कडक ताकिदही देण्यात आली आहे. कोणताही गैरप्रकार होत असेल किंवा कसल्याही प्रतिबंधित सामानांची वाहतूक केली जात असेल तर नजिकच्या आरपीएफ कर्मचाऱ्याला किंवा रेल्वेच्या हेल्पलाईन नंबर १३९ वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर