शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर केले व्हायरल, आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By भगवान वानखेडे | Updated: March 22, 2023 18:10 IST

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस २२ मार्च रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

बुलढाणा : शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करणाऱ्या, मोबाइल नंबर देऊन माझ्याशी बोल असे म्हण्याचा अट्टाहास करण्या, तसेच पीडितेचे अश्लील फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल करणाऱ्या आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात २१ मार्च रोजी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस २२ मार्च रोजी अटक केली असून, न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

  पीडितेच्या आईने २१ मार्च रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, त्या स्वत: पोलीस कॉन्स्टेबल म्हणुन कार्यरत आहेत. मागील वर्षी त्या प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर गेल्या असताना त्याच दरम्यान त्यांची आई आणि मुलगी बुलढाणा तालुक्यातील एका गावात लग्न समारंंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी ओम रामेश्वर पुरभे याची भेट झाल्यानंतर तो त्यानंतर सतत घरी येत होता. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या पीडित मुलीशी जवळीक साधून तिचा शिकवणी वर्गाला जात असताना पाठलाग करीत होता. याच दरम्यान त्याने त्याचा फोन नंबर पीडितेला देऊन ‘माझ्याशी बोल, तू फोन का घेत नाही’ म्हणुन धमकावत असल्याचेही तक्रारीत नमुद आहे.

बदनामीकारक फोटो केले व्हायरलआरोपीने १५ जानेवारी रोजी पीडितेचे अश्लील बदनामीकारक फोटो तसेच ७ आणि २७ फेब्रुवारी रोजी पीडितेचे अश्लील फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करुन पीडितेची आणि तिच्या कुटुंबियांची बदनामी केली. ऐवढेच नव्हे तर पीडितेला वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन व मॅसेज पाठवित असल्याचेही तक्रारीत नमुद आहे. तर २१ मार्च रोजीही आरोपीने पीडितेचा पाठलाग करुन तिचा हात पकडून विनयभंग केला. अशा तक्रारीवरुन शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी कारागृहात२१ मार्च रोजी तक्रारीवरुन आरोपी ओम रामेश्वर पुरभे याच्याविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली. तर २२ मार्च रोजी आरोपीस न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसInstagramइन्स्टाग्राम