शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

आसाम-मिझोराम बॉर्डरवर हिंसाचार; मुख्यमंत्र्यांनी PMO ला केले सतर्क

By हेमंत बावकर | Published: October 19, 2020 9:40 AM

Assam-Mizoram border issue: मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे. 

आसाम-मिझोरामच्या बॉर्डरवर शनिवार- रविवार रात्रीच्या सुमारास हिंसाचार उफाळून आला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी रविवारी रात्री दोन्ही राज्यांच्या सीमेवरील परिस्थिती पंतप्रधान कार्यालय आणि गृह मंत्रालयाला कळविली आहे. तसेच मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांच्याशी चर्चाही केली आहे. 

पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे म्हटले आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांना आसामच्या कछार जिल्हा आणि मिझोरामच्या कोलासिब जिल्ह्यातील सीमावर्ती भागात तैनात करण्यात आले आहे. यावर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे. 

सोनोवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात हा भाग वेगाने विकास करत आहे. या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. तसेच त्यांच्यातील संबंध चांगले व्हायला हवेत. सोनोवाल यांनी सांगितले की, मतभेद असू शकतात परंतू सर्व मतभेदांमध्ये चर्चा करूनच तोडगा काढला पाहिजे. 

मिझोरामचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी आंतरराज्य सीमेवर शांतता कायम ठेवणे आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. कछार जिल्ह्यातील लायलपूर भागात शनिवारी सायंकाळी आसाम आणि मिझोराम राज्यांच्या दोन गटांमध्ये हिंसाचार झाला. यामध्ये अनेक लोक जखमी झाले. लैलापूर भागात या गटांनी अनेक घरांना आग लावली. दुसरीकडे आसामचे वनमंत्री परिमल सुखावैद्य यांनी रविवारी लायलपूर भागाचा दौरा केला. तसेच शांतता राखण्याचे आवाहन केले. 

टॅग्स :prime ministerपंतप्रधानAssamआसाम