शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचा भंग; उत्तर पूर्व मुंबईतून लाखोंचा दारूसाठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 16:52 IST

उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ३२ जणांचे भरारी पथक, ३२ जणांची स्थिर पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

ठळक मुद्देकाही ठिकाणी मतदारांना आमिष दाखविण्यासाठी याचा वापर होत होता का? या दिशेनेही तपास सुरु आहे.शिवाजी नगर परिसरातून दोन लाखाचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. ही गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. सोसायटी तसेच सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षाचे फलक काढले नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त होते.

मुंबई - निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर पूर्व मुंबईत जवळपास ३ लाखांचा देशी, विदेशी दारुंचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याच बरोबरच रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. हा साठा कुणासाठा आणण्यात आला होता? याचा शोध पोलीस घेत आहेत.  तसेच शिवाजी नगर परिसरातून दोन लाखाचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे. ही गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. उत्तर पूर्व मुंबईचे निवडणूक अधिकारी विवेक गायकवाड यांच्या नेतृत्त्वाखाली ३२ जणांचे भरारी पथक, ३२ जणांची स्थिर पथक सर्व हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. तसेच व्हिडीओग्राफरही उमेदवार, पक्ष कार्यकर्त्यांवर नजर ठेवून आहेत. मुलुंड ते मानखुर्द शिवाजी नगर परिसरात नाकाबंदी दरम्यान जवळपास २ लाख ९० हजार रुपयांचा दारुसाठा पथकाच्या हाती लागला. १८ मार्च ते २४ मार्च पर्यंतची ही कारवाई आहे. पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत रिक्षाही जप्त करण्यात आली आहे. हा दारुसाठा कुठून व कुणाच्या सांगण्यावरुन आणण्यात आला. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. कार्यकर्त्यांसाठी हा दारुसाठा आणला असल्याची माहिती समजते. तर, काही ठिकाणी मतदारांना आमिष दाखविण्यासाठी याचा वापर होत होता का? या दिशेनेही तपास सुरु आहे.बुधवारपर्यंत निवडणूक आयोगाच्या सिव्हिजिल (सिटीजन व्हिजिलन्स) अ‍ॅपवर उत्तर पूर्व मुंबईत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी २० तक्रारी धडकल्या. तक्रारींचेही तात्काळ निवारण करण्यात आल्याचेही निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यात, सोसायटी तसेच सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षाचे फलक काढले नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण जास्त होते.

टॅग्स :liquor banदारूबंदीElectionनिवडणूकPoliceपोलिस