बोलण्यात गुंतवणूक दुकानदारांचे 2000 रुपये घेऊन पसार झाला भामटा; पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 16:55 IST2021-07-26T16:51:11+5:302021-07-26T16:55:02+5:30
यासंदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.

बोलण्यात गुंतवणूक दुकानदारांचे 2000 रुपये घेऊन पसार झाला भामटा; पोलिसांनी केली अटक
कल्याण: गेल्या काही दिवसांपासून मेडिकल मध्ये चोरी करण्याचं प्रमाण वाढलय. आता डोंबिवली पश्चिमेकडील एका मेडिकल दुकानात दुकानदाराला बोलण्यात गुंतवून त्याच्याकडील 2 हजार रुपये एक इसम पसार झाला होता. पोलिसांनी या भामट्याला अटक केली आहे.
डोंबिवली पश्चिमेत सुभाष रोड पारिसरात ग्लोबल मेडिकलमध्ये आरोपी गिरीश गायकर हा खरेदी करण्याचा बहाना करतं मेडिकलमध्ये गेला. यावेळी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवत त्याच्याकडून दोन हजार रुपये घेऊन पसार झाला. यासंदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वडणे यांनी सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे चोरट्याचा तपास सुरू केला.आरोपी हा डोंबिवली पश्चिम येथे असल्याची गुप्त माहिती विष्णुनगर पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी जाऊन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल.अधिक तपास केला असता आतापर्यंत ४ ठिकाणी असा प्रकार झाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालय. त्यामुळे कोणी अनोळखी इसमाशी बोलताना सावध रहा असं सांगण्याची वेळ आली आहे.