शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

फरार प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी पकडून केली मारहाण, रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची केली तयारी आणि....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 4:46 PM

Crime News: ग्रामस्थांनी एका प्रेमी युगुलाला पकडून त्यांना बांधून घातले. त्यानंतर या जोडप्याला मारहाण करण्यात आली. या युगुलाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळण्याची तयारी केली होती.

पाटणा - बिहारमधील जमुई जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाणे क्षेत्रात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. येथील हरमा पहाडी गावामध्ये ग्रामस्थांनी एका प्रेमी युगुलाला पकडून त्यांना बांधून घातले. त्यानंतर या जोडप्याला मारहाण करण्यात आली. या युगुलाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना जिवंत जाळण्याची तयारी केली होती. मात्र या प्रकाराची खबर समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रेमी युगुलाला ग्रामस्थांच्या तावडीतून सोडवले. ( The villagers caught the fugitive lover Yugula, beat him up, prepared to burn him alive by throwing a rockel )

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी चार मुलांची आई असलेली गिरजा देवी तिचा प्रियकर रंजित दास याच्यासोबत फरार झाली होती. दरम्यान या फरार प्रेमी युगुलाला ग्रामस्थांनी पकडले आणि पुन्हा गावात आणून झाडाला बांधून घातले. तिथे त्यांना मारहाण करण्यात आली. प्रेमी युगुल हे हरमा पहाडी गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

हरमा पहाडी गावातील महिला गिरिजा देवी आणि त्याच गावात राहणारा तरुण रंजित दास यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होतो. पाच दिवसांपूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये या विषयावरून वादही झाला होता. त्यानंतर चार मुलांची आई असलेली गिरिजा देवी ही तिच्या मुलांसोबत फरार झाली. शुक्रवारी सकाळी गावातील काही लोकांनी या दोघांना लक्ष्मीपूर परिसरातील जंगलामध्ये पकडले. त्यानंतर त्यांना गावात आणण्यात आले. गावात आणल्यानंतर या महिलेला विजेच्या खांबाला तर तिच्या प्रियकराला झाडाला बांधून घातले. त्यानंतर दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर केरोसिन घालून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लक्ष्मीपूर ठाण्याच्या प्रमुखांच्या नेतृत्वाखाली घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या जोडप्याला ग्रामस्थांच्या ताब्यातून सोडवण्यात आले. प्रेमी जोडप्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तसेच पोलिसांनी तपास सुरू केला. दोघांच्या जबाबाच्या आधारावर एफआयआर दाखल करून घेण्यात आली आहे. या घटनेला दुजोरा दिला आहे. प्रेमी युगुलाला मारहाण केली जात असल्याचे समजताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली आणि या युगुलाची सुटका केली, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार