शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

विजय सिंग मृत्यू प्रकरण : खोटी तक्रार देणाऱ्या जोडप्याविरोधात गुन्हा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 22:07 IST

या प्रकरणात विजयला मारहाण करून त्याच्याविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या जोडप्याविरोधातही पोलिसांनी आता गुन्हा नोंदवल्याची माहिती

ठळक मुद्दे विजय सिंग या २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन उभे केले होते. जोडप्याने खोटी माहिती देत विजयला मारहाणही केल्याचे चौकशीत पुढे आले.

मुंबई - वडाळा टी. टी. पोलिसांच्या चौकशीदरम्यान विजय सिंग या २६ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर स्थानिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन उभे केले होते. त्यानंतर पाच पोलिसांना निलंबित देखील करण्यात आले. या प्रकरणात विजयला मारहाण करून त्याच्याविरोधात खोटी तक्रार देणाऱ्या जोडप्याविरोधातही पोलिसांनी आता गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रणव अशोक यांनी दिली.दिवाळी सणानिमित्त २७ ऑक्टोबर रोजी वडाळा परिसरात राहणारा विजय हा त्याच्या दोन भावांसोबत त्याच्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी रात्री घराबाहेर पडला होता. ट्रक टर्मिनस येथे काही कामानिमित्त त्याने दुचाकी थांबवली. त्यावेळी त्याच्या गाडीची हेडलाइट समोर अंधारात असलेल्या एका प्रेमी जोडप्यावर पडल्याने वाद निर्माण झाला. त्यावेळी समोरील तरुणाने त्याच्या मित्रांना बोलवून विजयला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. गस्तीवर असलेले पोलीस त्या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी विजय, त्याच्या दोन भावांना आणि जोडप्यातील माणसाने बोलावलेले तरुणांना ताब्यात घेतले.पोलीस ठाण्यात आल्यानंतर या तरुणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच विजय सिंगच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यामुळे त्याला तात्काळ सायन रुग्ण्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.जोडप्याने खोटी माहिती देत विजयला मारहाणही केल्याचे चौकशीत पुढे आले. या घटनेनंतर वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात खोटी माहिती दिल्याप्रकरणी जोडप्यावर आणि विजयला मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर भा. दं. वि. कलम 341, 323, 504,506(2), 182, 211,34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वडाळा टी. टी. पोलीस अधिक तपास करत असून नागरिकांनी कायदा हातात न घेता शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस