शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

Video : नागपूरच्या ज्वेलर्स दुकानावर टाकलेल्या दरोड्याचा थरारक व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 11:09 IST

पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता

ठळक मुद्देपिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता

नागपूर : शहरातील जरीपटक्यातील अवनी ज्वेलर्समध्ये गेल्या आठवड्यात पिस्तुलाच्या धाकावर दरोडा घालणाऱ्या टोळीचा नागपूरपोलिसांनी छडा लावला. याप्रकरणी मध्यप्रदेशातील कटनी येथे या दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. जरीपटक्यातील भीम चौकाजवळ असलेल्या अवनी ज्वेलर्समध्ये चार दरोडेखोरांनी सोमवारी दुपारी २.१५ वाजता दरोडा घातला होता. आता, या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला आहे.

पिस्तुलाचा धाक दाखवून सराफा व्यावसायिक आशिष नावरे यांना बेदम मारहाण करून दरोडेखोरांनी चार लाखांची रोकड, ६०० ग्राम सोने तसेच दहा किलो चांदी घेऊन पोबारा केला होता. अत्यंत वर्दळीच्या भागात भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियातून समोर आले आहेत. दरोडेखोरांनी अगोदर सोने घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश केला. त्यानंतर, विचारपूस करतेवेळी दुकानदारावर हल्ला केला. आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने त्यांनी दुकानातील सोने आणि साहित्य घेवून पोबारा केला.   दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढला. ते मनसर-देवलापार मार्गे मध्यप्रदेशमध्ये पळून गेल्याचा अंदाज येताच पोलिसांच्या पथकाने तिकडे धाव घेतली. मध्यप्रदेश पोलिसांनाही कळविले. त्यानुसार रात्रीच्या सुमारास कटनी जवळ दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले. लुटीतील वीरेंद्र यादव आणि दीपक त्रिपाठी या दोघांना मध्य प्रदेश व महाराष्ट्र पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अटक केली आहे. ही टोळी उत्तरप्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस