शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Video : ... म्हणून दुचाकीस्वाराला ट्राफिक पोलिसाने लावला रस्ता स्वच्छ करायला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 21:37 IST

 दुचाकीस्वार रस्त्यावर थुंकला होता म्हणून ट्राफिक पोलिसांनी त्याला ही अनोखी शिक्षा दिली. 

ठळक मुद्देवाहतूक पोलीस बलदेव सिंग यांच्या निदर्शनास एक दुचाकीस्वार रस्त्यावर थुंकताना दिसला. त्यानंतर चेकपोस्टजवळ आल्यानंतर त्याला अडवलं आणि हाताने रस्त्यावर जिथे थुंकला होता ती जागा स्वच्छ करायला सांगितली.त्याने गवताने फक्त पुसून काढलं. रस्त्यावरची थुंकी पुसायला त्याला कोणी जबरदस्ती केली नव्हती. तो स्वत:च पुढे आला होता असे वाहतूक पोलीस बलदेव सिंग यांनी सांगितलं.

चंदिगढ - चंदिगढमधील ट्रिब्यून चौकात एका नाक्यावर वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराला रस्ता स्वच्छ करायला सांगितला. कारण दुचाकीस्वार रस्त्यावर थुंकला होता म्हणून ट्राफिक पोलिसांनी त्याला ही अनोखी शिक्षा दिली. 

ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, वाहतूक पोलीस बलदेव सिंग यांच्या निदर्शनास एक दुचाकीस्वार रस्त्यावर थुंकताना दिसला. त्यानंतर चेकपोस्टजवळ आल्यानंतर त्याला अडवलं आणि हाताने रस्त्यावर जिथे थुंकला होता ती जागा स्वच्छ करायला सांगितली. त्यानंतर दुचाकीस्वाराने जवळचं गवत घेऊन थुंकी पुसून काढली. याबाबतचा व्हिडीओ वायरल झाला असून सोशल मीडियावर दुचाकीस्वाराला ट्रोलही केलं जात आहे. वाहतूक पोलीस त्याच्याजवळ पाण्याची बाटली घेऊन गेले आणि हाताने ती जागा स्वच्छ धुवायला सांगितली.

दुचाकीस्वार रस्ता धुवत असताना एक पोलीस कर्मचारी म्हणाला, असं थुंकणं चांगलं आहे का, मुलांसोबत जात असताना इतकी मोठी चूक करताहात. याची मोठी शिक्षा आहे. असे कधीच करू नका. आम्ही इथे ड्युटी करतो आणि तुम्ही इथेच थुंकताय? अशी चूक पुन्हा करू नका. मी पाण्याची बाटली यासाठी सोबत घेऊन गेलो कारण ती व्यक्ती पाण्याने ती जागा स्वच्छ करू शकेल. पण त्याने गवताने फक्त पुसून काढलं. रस्त्यावरची थुंकी पुसायला त्याला कोणी जबरदस्ती केली नव्हती. तो स्वत:च पुढे आला होता असे वाहतूक पोलीस बलदेव सिंग यांनी सांगितलं.

 

टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस