शौचालयात व्हिडिओ शूटिंग; १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीने परिसरात खळबळ, मुंबईतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 13:22 IST2022-12-13T13:17:00+5:302022-12-13T13:22:49+5:30
वांद्रे पूर्वेकडील सिद्धार्थ कॉलनी परिसरात ही घटना घडली.

शौचालयात व्हिडिओ शूटिंग; १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीने परिसरात खळबळ, मुंबईतील घटना
मुंबई : सार्वजनिक शौचालयात व्हिडीओ शूटिंग केल्याची घटना खेरवाडी परिसरात समोर आली आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी रवींद्र गमरे नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
वांद्रे पूर्वेकडील सिद्धार्थ कॉलनी परिसरात ही घटना घडली. १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून पोलिस अधिक तपास करत आहेत. मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तरुणाने तिचा पाठलाग केला. शौचालयात गेल्याचे पाहताच दरवाजाच्या वरील लोखंडीपट्टी असलेल्या खिडकीतून मोबाईलमध्ये व्हिडीओ शूटिंग करण्याचा प्रयत्न केला.
सदर बाब लक्षात येताच मुलीने आरडाओरडा केला. तरुण तेथून पसार झाला. १८ नोव्हेंबरपासून आरोपी त्रास देत असल्याचा आरोप मुलीने केला आहे. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी विनयभंग प्रकरणात पोक्सोंतर्गत गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.