Video : धावत्या रिक्षातून स्टंटबाजी नडली, टवाळखोर तरुणांना पोलिसांनी केली अटक
By पूनम अपराज | Updated: December 29, 2020 19:14 IST2020-12-29T19:13:54+5:302020-12-29T19:14:33+5:30
Stunt in Kandivali : स्टंटबाजीत एक अल्पवयीन सामील

Video : धावत्या रिक्षातून स्टंटबाजी नडली, टवाळखोर तरुणांना पोलिसांनी केली अटक
मुंबई उपनगरातील कांदिवलीतील गणेश नगर परिसरात काही टवाळखोर तरुणांच्या स्टंटबाजीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रात्रीच्या वेळी एका रिक्षातून मित्रांनी स्टंटबाजी केली आणि हुल्लडबाजी करून महिलांशी गैरवर्तन केले असल्याचा आरोप आहे. धावत्या रिक्षात तरुण लटकत असताना आणि आक्षेपार्ह हातवारे करताना व्हीडिओमध्ये दिसताय आहेत. एकता नगर ते कांदिवली चारकोप दरम्यान हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येतं आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर एक विधिसंघर्ष बालक आहे.
कांदिवलीतील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या व्हिडिओत एक मुलगा बेदारकपणे रिक्षा चालवत आहे. या रिक्षेतून बाहेर लटकून एक तरुण माकडचाळे करत असल्याचे दिसत आहे. रिक्षेतून स्टंट करणाऱ्या अल्पवयीनला पोलिसांनी ताब्यात घेतले तर ऑटो रिक्षा चालक जोशी आणि रफिकला भा. दं. वि. कलम ३३६ आणि २७९ अन्वये अटक करण्यात आली आहे. विधी संघर्ष बालक हा स्कुटीवरून देखील स्टंटबाजी करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
कांदिवलीत टवाळखोर तरुणांचे माकडचाळे, धावत्या रिक्षात लटकून स्टंटबाजी pic.twitter.com/QcXW55zJMq
— Lokmat (@MiLOKMAT) December 29, 2020