मेरे पास तेरे जैसे चार है! डान्सर पूजाचा व्हिडीओ व्हायरल, उपसरपंचाच्या मृत्यूप्रकरणी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 16:37 IST2025-09-12T16:32:17+5:302025-09-12T16:37:57+5:30

माजी उपसरपंच गोविंद बरगे यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पूजा गायकवाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video of Pooja Gaikwad arrested in connection with the death of Upasarpanch Govind Barge goes viral on social media | मेरे पास तेरे जैसे चार है! डान्सर पूजाचा व्हिडीओ व्हायरल, उपसरपंचाच्या मृत्यूप्रकरणी अटकेत

मेरे पास तेरे जैसे चार है! डान्सर पूजाचा व्हिडीओ व्हायरल, उपसरपंचाच्या मृत्यूप्रकरणी अटकेत

Pooja Gaikwad: कलाकेंद्रातील डान्सरच्या नादाने माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. डान्सर पूजा गायकवाड हिच्यावर गोविंद बरगे यांनी लाखो रुपये उधळूनसुद्धा तिने गोविंद यांनी बांधलेला बंगला नावावर करा यासाठी हट्ट धरला होता. त्यामुळे तिने गोविंद यांच्याशी बोलणे बंद केले होते. याच नैराश्यातून गोविंद बर्गे यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. पोलिसांनी पूजा गायकवाडला अटक केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहेत. अशातच पूजा गायकावडचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झालीय.

बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बरगे यांनी ९ सप्टेंबर रोजी पहाटे डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. ही धक्कादायक घटना सासुरे तालुका बार्शी येथे पहाटेच्या सुमारास घडली होती. गोविंद बरगे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तुळजाभवानी कला केंद्र पारगाव येथील नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर वैराग पोलिसात गुन्हा दाखल झाला. पूजाला ताब्यात घेऊन वैराग पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. या आत्महत्येप्रकरणी पुढील तपास सुरु असून पुजाबाबत धक्कादायक खुलासे होत आहे.

आता पूजा गायकवाडचा आणखी व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पूजाला म्हणते की, मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है? त्यावेळी पूजा त्या व्यक्तीला, मेरे पास तेरे जैसे चार है, असं प्रत्युत्तर देते. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता पूजा विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.
 
गोविंद बरगे हे पूजाचे घर असलेल्या सासुरे येथे सोमवारी रात्री उशिरा आले होते. पण पहाटेच्या दरम्यान त्यांनी आत्महत्या केली. यावेळी नर्तकी पूजा नेमकी तुळजाभवानी कला केंद्र पारगाव येथे होती की सासुरे येथे होती, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. याचा तपास लावण्याचे आव्हान वैराग पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, लुखामसाला येथील माजी उपसरपंच गोविंद बरगे यांनी सासुरे येथे आत्महत्या केली होती. त्यांच्या पार्थिवाचे विच्छेदन सोलापूर येथे केल्यानंतर त्यांच्या मूळ गावी काल अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तसेच शवविच्छेदनाचा अहवाल वैराग पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात फायर आर्म इंजुरी टू हेड असे नमूद करण्यात आले आहे. फॉरेन्सिक टीमकडून कार क्र. एमएच २३ बी एच ५०२० या गाडीत गोविंद बरगे यांनी ज्या पिस्तूलने गोळी झाडून आत्महत्या केली त्या पिस्तुलाच्या गोळीचा पुढील भाग मिळून आला आहे.

Web Title: Video of Pooja Gaikwad arrested in connection with the death of Upasarpanch Govind Barge goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.