शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करून बनवला व्हिडीओ अन् दिली धमकी; कोणाला सांगितलं तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 19:12 IST

Rape Case : पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिच्या बहिणीवरही बलात्कार करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर भावाला जीवे मारण्याची धमकीही दिली.

बिहारमधील गया येथे दहावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. बलात्कार करणारा नराधम पोलीस यंत्रणेचाच व्यक्ती निघाला. पीडितेवर बलात्कार केल्यानंतर तिच्या बहिणीवरही बलात्कार करण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर भावाला जीवे मारण्याची धमकीही दिली.     वास्तविक, गया जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलगी आपल्या बहिणीच्या लग्नासाठी आणि कुटुंबाच्या अब्रूसाठी आत्महत्या करण्यासाठी टेकडीवर चढत होती तेव्हा स्थानिक लोकांनी तिला वाचवले.

प्रेयसी आणि प्रियकराने गाठला विकृतीचा कळस; अल्पवयीन भावाने बहिणाचा केला लैंगिक छळबलात्काराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

पतलुक्का पोलीस स्टेशनचे चौकीदार विजय पासवान यांच्या मुलाने गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता आणि त्याच्या मित्रांनी बलात्काराचा व्हिडिओ बनवला होता. आरोपीने विद्यार्थिनीला धमकी दिली होती, त्यानंतर तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. असा आरोप आहे की, जेव्हा कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसानेच पीडित मुलीला हे कोणालाही सांगू नकोस अशी धमकी दिली. पोलिसाने त्यांना मारहाण केल्याचा देखील आरोप आहे.

म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण 

म्हैस खरेदी करायला गेलेल्या महिलेवर बलात्कार; थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले अन्...

अर्धनग्न अवस्थेत सापडला मृतदेह, सामूहिक बलात्कारानंतर केली हत्या; लोकं उतरली रस्त्यावरपोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवण्याऐवजी आरोपीविरोधात केस न करण्याची धमकी देऊ लागल्याचा आरोप बलात्कार पीडितेच्या मावशीने केला आहे. पीडित मुलीच्या मावशीने सांगितले की, जर तिला न्याय मिळाला नाही तर ती बिहारच्या डीजीपीकडे तक्रार करणार आहे.बलात्कार करताना मित्रांसोबत व्हिडिओ बनवलाविद्यार्थिनीने सांगितले की, गावातील रहिवासी विकास कुमार याने तिच्यावर बलात्कार केला आणि विकास कुमारचे मित्र बिक्कू सिंह, श्रवण आणि अन्य एकाने व्हिडीओ बनवला. पीडितेने सांगितले की, धमकी देताना विकासने सांगितले होते की, जर घडलेली घटना तिच्या कुटुंबीयांना सांगितली तर तिच्या बहिणीशीही असेच दुष्कृत्य करेल. इतकंच नाही तर तिच्या भावाची हत्या करेल.या धमकीने वैतागलेल्या पीडितेने सांगितले की, आपल्या कुटुंबाची अब्रू, बहिणीची इज्जत आणि भावाचा जीव वाचवण्यासाठी तिने टेकडीवर चढून, ब्लेडने नसा कापून आणि नंतर टेकडीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पण टेकडीवर जात असताना कोणीतरी पाहिले आणि लोकांनी तिला वाचवले.गया एसएसपी आदित्य कुमार यांनी सांगितले की, असे प्रकरण समोर आले आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल.

 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळBiharबिहारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी