शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Video : लॉकडाऊनचा फज्जा! चक्क सिमेंट मिक्सरमधून प्रवास करणाऱ्या 18 जणांना पोलिसांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 16:54 IST

Coronavirus Lockdown : ते 18 जण महाराष्ट्रातून लखनौला जात होते.

ठळक मुद्दे एएनआयने 41 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्वीट केला असूूून त्यात लोक एकामागून एक टाकीमधून बाहेर पडताना दिसत आहे.तरीदेखील स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या हालचाली नॉन कंटेन्मेंट झोनपुरत्या मर्यादित केल्या जातील.

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पोलिसांना कॉंक्रिट मिक्सर ट्रकच्या टाकीमध्ये अठरा जण प्रवास करताना आढळले. एएनआयने स्थानिक अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटले आहे की, केंद्राने अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी परत जाण्याची परवानगी दिली आहे.

 

एएनआयने 41 सेकंदाचा एक व्हिडिओ ट्वीट केला असूूून त्यात लोक एकामागून एक टाकीमधून बाहेर पडताना दिसत आहे. ते 18 जण महाराष्ट्रातून लखनौला जात होते. ट्रक पोलिस ठाण्यात पाठविण्यात आला आहे आणि एफआयआर नोंदविण्यात आला आहे. इंदूर-उज्जैन रोडवर आज सकाळी पंथपिपलाई बॉर्डरवर पोलिसांनी एक सिमेंट काँक्रिटचा मिक्सर थांबवला. पोलिसांनी थांबवल्यामुळे चालक घाबरला. त्यामुळे पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी सिमेंट मिक्सर चेक केला असता त्यामध्ये 18 मजूर लपून बसलेले होते. त्यानंतर सर्वांना पोलिसांनी बाहेर काढून ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक उमाकांत चौधरी यांनी एएनआयने दिली.

केंद्रीय गृहमंत्रालयाने 29 एप्रिल रोजी अडकलेल्या प्रवासी कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी परत यावे यासाठी आंतरराज्यीय नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. तरीदेखील स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांच्या हालचाली नॉन कंटेन्मेंट झोनपुरत्या मर्यादित केल्या जातील.

Coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरच्या ३ पोलिसांना कोरोना

 

CoronaVirus: रेल्वे गाड्या सोडल्या जात असल्यानं मजुरांच्या अपेक्षा पल्लवित; पण मार्ग सापडेना

गृृृह मंत्रालयाने म्हटले आहे की नवीन मार्गदर्शक तत्त्वे 4 मेपासून अंमलात येतील, ज्यामुळे "अनेक जिल्ह्यांना विश्रांती मिळेल." मार्गदर्शक सूचनांनुसार अनेक अडकलेली लोक  कठोर वैद्यकीय तपासणी करून घरी परत जाऊ शकतात.

राज्याने अडकलेल्या सर्वांसाठी थर्मल टेस्टिंग युनिट्स आणि अलग ठेवण्याच्या सुविधा देखील त्यांना पाठविण्यापूर्वी नियोजन केले पाहिजेत. त्यांनी वाहतुकीसाठी सॅनिटाइज्ड बसेसचीही व्यवस्था केली पाहिजे, असे त्यात म्हटले आहे.

कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून मार्चपासून देशभरातून पायी व सायकल, नौका आणि रुग्णवाहिकांवर प्रवास केल्याच्या वृत्ताची नोंद झाली आहे. त्यास दोनदा आणि आता 17 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. बरेच लोक दूरवर प्रवास करताना मरण पावले आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्र