शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Video : वाहतूक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेणाऱ्या व्यवसायिकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 21:24 IST

Traffic Police : तो मिडियाकर्मी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र, त्यात तथ्य नसून तो कपड्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसुहेल कथुरुया (३०) नामक व्यवसायीकाला डी एन नगर पोलिसानी शुक्रवारी अटक केली.

मुंबई - वाहतूक पोलीस विजयसिंह गुरव (४८) यांना स्वतःच्या कारवरून 'बोनेट ड्राईव्ह' करवणाऱ्या सुहेल कथुरुया (३०) नामक व्यवसायीकाला डी एन नगर पोलिसानी शुक्रवारी अटक केली. अंधेरीतील त्याच्या राहत्या घरातून त्याचा गाशा गुंडाळण्यात आल्याचे पोलिसानी सांगितले. तो मिडियाकर्मी असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र, त्यात तथ्य नसून तो कपड्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती आहे.

वाहतूक पोलिसाला कार चालकाने कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची घटना मुंबईतील अंधेरीच्या डी. एन. नगर परिसरात घडली. नो एंट्रीत घुसणाऱ्या कारला हा पोलीस थांबवत होता. मात्र गाडी न थांबविल्याने वाहतूक पोलिसाने बोनेटवर उडी मारली. तरी देखील चालकाने कार न खांबवता पोलिसाला पुढे फरफत नेले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पुढे काही स्थानिक लोकांनी ही गाडी थांबवली आणि वाहतूक पोलिसाला बोनेटवरून खाली उतरवले. या प्रकारानंतर कारचालक कार घेऊन पळून गेला. हा प्रकार आज (३० सप्टेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमाराला घडला. विजय गुरव असे या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशनच्याखाली जे पी रोड येथे ड्युटी करत होते.  त्यावेळी MH 02 DQ 1314 क्रमांकाची काळ्या रंगाची हुंडाई क्रेटा कार नो एंट्रीत आली.

कार नो एंट्रीत आल्याचे पाहून वाहतूक पोलीस दुरव यांनी ही कार थांबवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही कार चालकाने कार थांबवली नाही. गुरव यांनी कारच्या आडवे येत कार थांबवण्याचा प्रयत्न केला. आपण कारच्या पुढे आहोत हे पाहिल्यावर कार चालक कार थांबवेल असे गुरव यांना वाटले.मात्र कार चालकाने कार न थांबवता तशीच पुढे नेली. शेवटी कारच्या धक्क्याने गुरव कारच्या बोनेटवर सरकले. त्यानंतर चालकाने गुरव यांना फरफटत काही अंतर पुढे नेले. या प्रकरणी आता अंधेरीतील डी एन नगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसMumbaiमुंबईPoliceपोलिसAndheriअंधेरीArrestअटक