कानपूर पोलिसांनी विनापरवाना किडनी प्रत्यारोपण केल्याप्रकरणी ६ जणांना अटक करून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या गँगने मेरठच्या पारुल तोमर या महिलेसाठी बिहारच्या आयुष नावाच्या तरुणाला ६ लाखांचं आमिष दाखवून किडनी देण्यासाठी तयार केलं होतं. हा संपूर्ण व्यवहार टेलीग्राम ग्रुपच्या माध्यमातून झाला होता. मात्र तरुणाला ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे न मिळाल्याने हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. तपासादरम्यान मेरठच्या अल्फा हॉस्पिटलचाडॉक्टर अफजल आणि इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने खळबळ उडाली.
कानपूर पोलिसांनी आहुजा हॉस्पिटलचेडॉक्टर सुरजित, त्यांची पत्नी प्रीती आहुजा आणि बनावट डॉक्टर बनलेला रुग्णवाहिका चालक शिवम यांच्यासह इतरांना जेलमध्ये टाकलं आहे. याच दरम्यान डॉक्टर अफजलचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो एका बेडवर नोटांच्या बंडलसोबत झोपलेला दिसत आहे. हातामध्ये नोटा घेऊन हा आरोपी डॉक्टर रील बनवत आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
'असा' उघड झाला काळा धंदा
तपासात असं समोर आलं आहे की, या गँगने डोनर शोधण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. मेरठच्या अल्फा हॉस्पिटलचा डॉक्टर अफजल याने टेलीग्रामवर किडनीची मागणी केली होती. डेहराडूनमध्ये शिकणाऱ्या बिहारच्या आयुष नावाच्या विद्यार्थ्याला ६ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याला प्रत्यक्षात केवळ ३.५० लाख रुपयेच मिळाले. पैशांच्या याच वादातून पोलीस या काळ्या धंद्यापर्यंत पोहोचले. आता मेरठचे आरोग्य विभागही एक्टिव्ह झाले असून संशयितांचा शोध सुरू आहे.
आरोग्य विभागाची नोटीस
मेरठचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. अशोक कटारिया यांनी अल्फा हॉस्पिटलला नोटीस बजावून तीन दिवसांत स्पष्टीकरण मागवलं आहे. या नोटीसमध्ये फिजिओथेरपिस्ट अमित कुमार, डॉक्टर वैभव मुदगल आणि डॉक्टर अफजल यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश आहे. दुसरीकडे, हॉस्पिटलचे मॅनेजर सचिन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्याकडे अफजल नावाचा कोणताही डॉक्टर नाही आणि मालक अमित यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या पोलीस हॉस्पिटलचे रेकॉर्ड तपासत आहेत.
Web Summary : A doctor involved in an illegal kidney transplant racket in Kanpur is seen in a viral video rolling on a bed of cash. Police investigation revealed a network using digital platforms to find donors, offering money for kidneys. The hospital is under investigation.
Web Summary : कानपुर में किडनी प्रत्यारोपण रैकेट में शामिल डॉक्टर नोटों के बिस्तर पर लेटा वीडियो में दिखा। पुलिस जांच में किडनी के लिए पैसे की पेशकश करते हुए डोनर खोजने के लिए डिजिटल प्लेटफॉर्म का उपयोग करने वाला नेटवर्क सामने आया। अस्पताल जांच के दायरे में है।