Video : मोबाईलवर बोलता बोलता महिला पडली मॅनहोलमध्ये, लोकांनी काही सेकंदात वाचवले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 07:24 PM2022-04-22T19:24:25+5:302022-04-22T19:25:45+5:30

A woman fell into a manhole : महिलेला किरकोळ ओरखडे आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

Video: A woman fell into a manhole while talking on a mobile, people saved lives in a few seconds | Video : मोबाईलवर बोलता बोलता महिला पडली मॅनहोलमध्ये, लोकांनी काही सेकंदात वाचवले प्राण

Video : मोबाईलवर बोलता बोलता महिला पडली मॅनहोलमध्ये, लोकांनी काही सेकंदात वाचवले प्राण

Next

पाटणा : पाटण्यात उघड्या मॅनहोलमुळे एक महिला त्यात पडली. मात्र, लोकांनी वेळीच तिला मॅनहोलमधून बाहेर काढून वाचवले. सात ते आठ फुटांचा खड्डा असलेला हा मॅनहोल उघडा असून महिला मोबाईल फोनवर बोलत जात होती. याच दरम्यान ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजता ही घटना घडली. महिलेला किरकोळ ओरखडे आले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

वास्तविक, पाटणा शहरातील वॉर्ड-56 अंतर्गत मलिया महादेव जल्ला रोडवर एक मॅनहोल उघडा होता. नमामि गंगे योजनेंतर्गत नाल्याच्या बांधकामासाठी उघडलेली चेंबर महिलेने पहिले नाही आणि ही दुर्घटना घडली. दुसरे कारण म्हणजे महिलेसमोर टोटो वाहन चालत होतं, त्यामुळे चेंबर उघडे होते ते दिसले नाही. महिलाही मोबाईलवर बोलत होती.

काही सेकंदात लोकांनी महिलेला बाहेर काढले

येथे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर ती महिला कशी पडते आणि आजूबाजूचे लोक तिला वाचवण्यासाठी धावतात हे स्पष्टपणे दिसत आहे. लोकांनी प्रसंगावधान दाखवत काही सेकंदात महिलेला मॅनहोलमधून बाहेर काढले. मॅनहोलमधून बाहेर काढल्यानंतर महिला बराच वेळ शॉकमध्येच राहिली.



शहरात कुठे रस्ते खराब तर कुठे मॅनहोल उघडलेले 

पाटण्यात कुठे मॅनहोल उघडे आहेत तर कुठे रस्ते खराब आहेत. याबाबत स्थानिकांमध्ये नाराजी आहे. एनएमसीएच ते मालिया महादेव जल्ला रोडपर्यंत नमामि गंगेचे काम सुरू असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सध्या नाल्याजवळून ऑटो व चारचाकी वाहनांची ये-जा सुरूच आहे. नमामि गंगे आणि इतर कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत.

 

 

Web Title: Video: A woman fell into a manhole while talking on a mobile, people saved lives in a few seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.