शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ, देवगिरी एक्स्प्रेसमध्ये आमदारांचे साहित्य चोरीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:07 IST

पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांकडचे साहित्य प्रवासादरम्यान चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघड झाला.

डोंबिवली  -  पावसाळी अधिवेशनासाठी मुंबईला आलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांकडचे साहित्य प्रवासादरम्यान चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार उघड झाला. हा प्रकार कल्याण ते ठाणे रेल्वेस्थानकांदरम्यान विदर्भ, आणि देवगिरी एक्स्प्रेसमध्ये सोमवारी सकाळी घडला. दोन्ही आमदारांनी याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.मलकापूर येथून रविवारी चिखली मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे हे पत्नी वृषाली यांच्यासह विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. तर, शिवसेनेचे मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमूलकर आणि सिंदखेडाराजा मतदारसंघाचे आमदार शशिकांत खेडेकर जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने सोमवारी मुंबईला पोहचले. सोमवारी सकाळी ७ वाजता कल्याण स्थानकात उतरत असताना त्यांच्या पत्नीजवळील पर्स हिसकावून चोरट्याने पळ काढला. बोंद्रे यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाइलही लांबवली. चोरट्याचा पाठलाग करण्याचा बोंद्रे यांनी प्रयत्न केला. पर्समध्ये २६ हजारांची रोकड, एटीएम कार्डसह इतरही साहित्य चोरीला गोल्याची तक्रार मुंबई येथील रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.दुसऱ्या घटनेत देवगिरी एक्स्प्रेसने प्रवास करणारे आमदार रायमूलकर यांना सकाळी जाग आली तेव्हा ५६ हजारांचा मोबाइल आणि दहा हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. तसेच आमदार खेडेकर यांच्या बॅगेलाही ब्लेडने कापले असल्याचे लक्षात आले. कल्याण ते ठाणे स्टेशनदरम्यान हा सर्व प्रकार घडला, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी सांगितले. स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेºयाच्या माध्यमातून पर्स हिसकावणाºया चोरट्याचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच चोरट्यांचा शोध घेण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :ThiefचोरCrime Newsगुन्हेगारी