लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 02:07 IST2018-11-19T02:07:37+5:302018-11-19T02:07:46+5:30
लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून २७ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याप्रकरणी, अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांपासून २७ वर्षीय तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून तिची फसवणूक केल्याप्रकरणी, अॅण्टॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायन-कोळीवाडा इंदिरानगर येथे राहणाऱ्या तरुणीचे शेजारीच राहणाºया किरण विश्वास (२७) या तरुणाशी २०१६ पासून प्रेमसंबंध जुळले होते. किरणने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. गेल्या महिन्यात किरणने नकार देत दुसºया मुलीशी लग्न करून पीडित तरुणीची फसवणूक केली.
पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून किरण याच्या विरोधात बलात्कार, फसवणूक आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात किरणला शनिवारी रात्री अटक करण्यात आली.