प्रेम, लिव्ह इन, धोका! प्रेयसीसह केली तिच्या आईची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 09:43 PM2020-03-10T21:43:06+5:302020-03-10T21:44:17+5:30

प्राथमिक तपासात मुलीचा लिव्ह इनमध्ये असलेल्या मुलाने पहाटे मृत कुटुंबियांच्या कारमधून पळ काढला होता असल्याचे उघड झाले.

vasundhara enclave double murder live in partner suspect of killing pda | प्रेम, लिव्ह इन, धोका! प्रेयसीसह केली तिच्या आईची हत्या

प्रेम, लिव्ह इन, धोका! प्रेयसीसह केली तिच्या आईची हत्या

Next
ठळक मुद्देपोलिसांनी आई-मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. आत जाऊन पाहिले तर तिने घरात सुमिता आणि समरिता रक्ताच्या थारोळ्यात असलेले पाहिले.दक्षिण दिल्लीतील गढ़ी गावात राहणारा विक्रांत उर्फ विनय नागर यांचा सुमिता यांची मुलगी समरिता हिच्याशी प्रेमसंबंध होते.

नवी दिल्ली - सकाळी पहाटे चारच्या सुमारास मनसारा अपार्टमेंटच्या आतून एक कार वेगाने बाहेर आली. बंद गेटला धडक दिल्याने सुरक्षारक्षक खडबडून जागा झाला.  गाडीच्या आत बसलेल्या व्यक्तीला पहारेकरी ओळखत होते. मुलाने सॉरी म्हटल्यावर सुरक्षारक्षकाने गेट उघडला आणि बॅरिकेड काढून गाडी सोडली. कारमध्ये चालकाव्यतिरिक्त आणखी एक तरुणही बसला होता. सकाळी आठच्या सुमारास नोकराने दरवाजा उघडून मोठमोठ्याने आरडाओरडा केला, तेव्हा दुहेरी हत्या प्रकरण उघडकीस आले आणि या घटनेने अपार्टमेंटमधील रहिवासी हैराण झाले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात मुलीचा लिव्ह इनमध्ये असलेल्या मुलाने पहाटे मृत कुटुंबियांच्या कारमधून पळ काढला होता असल्याचे उघड झाले.

लिव्ह इनमध्ये राहत होते, मात्र नात्यात कटुता आली होती
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील गढ़ी गावात राहणारा विक्रांत उर्फ विनय नागर यांचा सुमिता यांची मुलगी समरिता हिच्याशी प्रेमसंबंध होते. दोघेही जवळजवळ चार वर्षे लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यामुळे विक्रांत बहुतेक वेळा त्याच्या घरी रहायचा. पण सुमारे तीन ते चार महिन्यांपासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. नात्यातील कटुता इतकी वाढली होती की हे प्रकरण ब्रेकअपपर्यंत पोचले होते. सुरुवातीच्या चौकशीत असे उघडकीस आले आहे की, विक्रांत आई-मुलीच्या पैशांवर मौजमजे करीत असे. तो बर्‍याचदा सुमिता यांची गाडी वापरत असे.


 

घरकाम करणाऱ्या बाईने पहिले रक्ताने माखलेले मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमिता आणि तिची मुलगी समरिता काही वर्षे वसुंधरा एन्क्लेव्हमधील मनसारा अपार्टमेंटच्या तिसर्‍या मजल्यावर राहत होती. मूळचे केरळमधील असलेल्या सुमिताच्या पतीचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. ती नोएडा -142 स्वयंसेवी संस्थेत उच्च पदावर कार्यरत होती. त्यांच्या मुलीने शिक्षण घेतल्यानंतर हॉस्पिटॅलिटीचे प्रशिक्षण घेत होती. मागील काही काळापासून, समरिता त्याच्या मित्रासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. तो मित्र तिच्या घरी येत - जात असे. आई व मुलगी दररोज सकाळी आपआपल्या कारने घर सोडत. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास सुमिताच्या घरी काम करणारी मोलकरीण घरी पोचली आणि दार उघडे पाहिले. आत जाऊन पाहिले तर तिने घरात सुमिता आणि समरिता रक्ताच्या थारोळ्यात असलेले पाहिले.

आरोपीला अटक
मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर शेजार्‍यांनी घराकडे धाव घेतली, नंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, ते दोघे शुक्रवारी शेवटच्या वेळेस आपापल्या कार्यालयात गेले होते. पोलिसांना घरातील सर्व वस्तू विखुरलेल्या आढळल्या. घरात दागिने आणि रोख रक्कम गहाळ होण्याची शक्यता वर्तवली. पोलीस हत्येबाबत सध्या काहीही बोलण्यास तयार नाही. घरात कोणताही पुरावा सापडला नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. घराच्या मैत्रीपूर्ण संबंध असल्याने पहाटे तडकाफडकी लिव्ह इनमध्ये असलेला मित्र घरातून पळ काढल्याने पोलिसांची संशयाची सुई त्याच्याकडे होती. पोलिसांनी आई-मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. यावेळी पोलिसांची अनेक पथके तयार करून आरोपींचा शोध घेतला असता त्यांना आरोपीला अटक केली.


दागिने आणि रोख रक्कम देखील गायब 
तपासादरम्यान घरात दागिने आणि रोकडही गायब असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांना घराच्या सभोवतालचे सर्व सामान विखुरलेले आढळले ज्यावरून असे दिसते की, आरोपींनी संपूर्ण घर साफ केले. हत्येसाठी धारदार शस्त्रे वापरण्यात आला आहे. दोघींच्या शरीरावर अनेक वेळा वार करण्यात आले आहे. सकाळी विक्रांतने गेटला धडक दिली तेव्हा तोसुद्धा सुरक्षारक्षकाला सॉरी बोलून निघून गेला. अपार्टमेंटमध्ये नेहमी येणे - जाणे असल्याने सुरक्षारक्षकाने संशय घेतला नाही. अपार्टमेंटमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी कॅमेऱ्यामध्ये प्रवेश करून गेटच्या समोर कारमधून बाहेर पडताना दिसत आहेत. 

Web Title: vasundhara enclave double murder live in partner suspect of killing pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.