Vashi Gang Rape : गुदमार्गात नारळ घुसवण्याचा जीवघेणा प्रकार; समलैंगिक कृत्याचा वाशीतील अड्डा उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 08:48 IST2019-10-01T07:45:35+5:302019-10-01T08:48:06+5:30
Vashi Gang Rape : वाशीतील अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास सुरू

Vashi Gang Rape : गुदमार्गात नारळ घुसवण्याचा जीवघेणा प्रकार; समलैंगिक कृत्याचा वाशीतील अड्डा उघड
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - वाशीतील सागर विहार परिसरात तरुणावर झालेल्या अनैसर्गिक लैंगिक अत्याचार प्रकरणी तपासात समलैंगिकांचा अड्डा उघड झाला आहे. सागर विहारपासून काही अंतरावरच पडीक इमारतीमध्ये हा अड्डा चालत होता. त्याठिकाणी समलैंगिकांकडून गुदमार्गात नारळ घुसवण्याचा जीवघेणा खेळ चालायचा.
सामूहिक बलात्कार झालेल्या तरुणावर तब्बल साडेतीन तास शस्त्रक्रिया; नारळ बाहेर काढला
तुर्भे येथे राहणाऱ्या 34 वर्षीय तरुणाच्या गुदमार्गात नारळ घुसवल्याचा प्रकार मागील आठवड्यात उघड झाला होता. सदर पीडित तरुणाच्या तक्रारीवरून त्याच्यावर पाच तरुणांनी अनैसर्गिक सामूहिक अत्याचार केल्यानंतर ते कृत्य केल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. त्या अनुशंगाने वाशी पोलीस तपास करत असताना समलैंगिक संबंधाचा अड्डा उघडकीस आला आहे. घटनेच्या दिवशी पीडित तरुणाची मोटरसायकल ज्या ठिकाणी उभी होती, त्यापासून काही अंतरावर हा अड्डा चालायचा. अनेक वर्षांपासून वापरात नसलेल्या चार मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हा अड्डा होता.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे छोट्या मोठ्या आकाराचे नारळ, पाईप व इतर वस्तू आढळल्या. याशिवाय एक अंथरलेली गादीदेखील आढळून आली. तर संपूर्ण घरामध्ये व परिसरात मोठ्या प्रमाणात नारळ आढळून आले. यातील काही नारळ सोललेले होते. यासोबतच बंद बाटलीत तेलासारखे द्रवदेखील त्या खोलीत आढळून आले. याच ठिकाणी समलैंगिक तरुणांचा अड्डा असून तिथे गुदमार्गात नारळ घुसवण्याचा जीवघेणा प्रयोग चालत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. मात्र पीडित तरुणासोबत घडलेल्या प्रकारामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही व सीडीआरदेखील मिळवला आहे. त्यामध्ये पीडित तरुण ठराविक कालावधीसाठी सीसीटीव्हीमध्ये दिसत नाहीए. मात्र सागर विहारच्या झाडीत अत्याचार झाल्यानंतर आपण त्या पडीक इमारतीमध्ये स्वतः नारळ काढण्यासाठी गेलो होतो अशी माहिती पीडित तरुणाने पोलिसांना दिली आहे. सागर विहारला पोहोचल्यानंतर तो काही वेळासाठी तिथल्या सीसीटीव्हीत दिसेनासा झाला होता. याच कालावधीत त्याच्यासोबत अत्याचाराची घटना घडली असावी, असाही अंदाज वर्तवला जात आहे. वाशीतील समलैंगिकांचा अड्डा समोर आल्याने पोलिसांना तपासाची दिशा मिळाली आहे. मात्र पीडित तरुणांकडून प्रत्यक्षात घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी वाशी पोलीस करत आहेत.