शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाशीतील प्रकरण : लैंगिक अत्याचार नसून स्वेच्छेने प्रकार घडल्याचा पोलीसांचा निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 23:20 IST

मोबाईलमधील फोटोमुळे ‘त्या‘ घटनेचा उलगडा

ठळक मुद्देमात्र तक्रारीत तरुणाकडून ज्या घटनेचा उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये व प्रत्यक्षात तपासात समोर आलेल्या बाबीत तफावत असल्याचे वाशी पोलीसांचे म्हणने आहे. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे.त्याच वस्तू पिडीत तरुणाच्या मोबाईलमधील फोटोत दिसून येत आहेत.

नवी मुंबई - सागर विहार परिसरात तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झालेच नसून, स्वेच्छेने हा प्रकार घडल्याचा निकष पोलीसांनी तपासअंती लावला आहे. तक्रारदार तरुणाच्या मोबाईलमध्ये घटनास्थळावरील फोटोवरुन पोलीसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. त्यामुळे घडलेले प्रकरण दडपण्यासाठी त्याने अत्याचाराचा बनाव केला असल्याचेही पोलीसांचे म्हणणे आहे.वाशीतील सागर विहार परिसरात आपल्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार व अमानुष कृत्य घडल्याची तक्रार तुर्भेतील तरुणाने केली होती. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी तपासाला सुरवात केली. मात्र तरुणाच्या तक्रारीत व तपासात समोर आलेल्या बाबींमध्ये तफावत दिसून येत होती. अशातच पोलीसांच्या पाहणीत सागर विहार परिसरातच समलैंगिक संबंधाचा अड्डा उघडकीस आला. ज्या प्रकारे तरुणावर अत्याचार झालेला होता, त्याच प्रकारच्या वस्तु त्या अड्डयावर पोलीसांना आढळून आल्या आहेत. तर त्याच वस्तु पिडीत तरुणाच्या मोबाईलमधील फोटोत दिसून येत आहेत. यावरुन संपुर्ण प्रकार सागर विहारच्या झाडीत झाला नसुन, परिसरातल्या पडिक इमारतीमध्ये झाल्याचा निकष पोलीसांनी लावला आहे. तसेच त्याच्यावर अत्याचार झाला नसुन स्वेच्छेतून संपूर्ण प्रकार घडला असल्याचाही तर्क पोलीसांनी लावला आहे. तपासादरम्यान पोलीसांनी त्याचा मोबाईल तपासला असता, त्यामध्ये सागर विहार परिसरातील पडिक इमारतीमधील समलैंगिकांच्या अड्डयातले फोटो आढळून आले. त्याद्वारे घटनेची वेळ देखिल पोलीसांना कळलेली आहे. मात्र तक्रारीत तरुणाकडून ज्या घटनेचा उल्लेख केलेला आहे, त्यामध्ये व प्रत्यक्षात तपासात समोर आलेल्या बाबीत तफावत असल्याचे वाशी पोलीसांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे. मात्र वाशीत ज्याठिकाणी समलैंगिकांचा अड्डा चालत होता, त्याठिकाणी जमणाऱ्यांचाशोध घेवून कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणNavi Mumbaiनवी मुंबई