शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीत दिवसाढवळ्या एन्काऊंटर! दोन डझनहून अधिक गुन्हे अन् २ लाखांचं बक्षिस असलेल्या गुंडाचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 15:33 IST

उत्तर प्रदेशात २५ मार्च रोजी योगी सरकार दुसऱ्यांदा विराजमान होईल. पण त्याआधीच गुन्हेगारांविरोधातील फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेशात २५ मार्च रोजी योगी सरकार दुसऱ्यांदा विराजमान होईल. पण त्याआधीच गुन्हेगारांविरोधातील फास आवळण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. गुन्हेगाऱ्यांचा काळ्या कमाईवर बुल्डोजर चालवल्यानंतर आता फरार आरोपींचा थेट एन्काऊंटर करण्यास सुरुवात झाली आहे. वाराणसीत दिवसाढवळ्या २ लाखांचं बक्षीस असलेल्या गुंड मनीष सिंह सोनू याचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला आहे. 

मनीष सिंह सोनू याच्यावर दोन लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. त्याचा अखेर आज उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं खात्मा केला आहे. एनडी तिवारी हत्याकांडासह अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मनीष सिंह सोनू याचा सहभाग होता. त्याच्यावर जौनपूर, गाजीपूर, वाराणसी आणि चंदौली येथे एकूण मिळून दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल होते. 

गेल्या अनेक वर्षांपासून होता फरारमनीष सिंह सोनूचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला बक्षीस स्वरुपात दोन लाख रुपये दिले जातील असं अलिकडेच जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या काही वर्षांपासून तो फरार होता. २८ ऑगस्ट २०२० रोजी मनिष सिंह यानं चौकाघाट येथे दिवसाढवळ्या हिस्ट्रीशीटर अभिषेक सिंह प्रिंस यांच्यासह दोन जणांची हत्या केली होती. याआधी मनिष सिंह आझमगढ येथील एका सराफा व्यावसायिकाची लूटमार आणि खून प्रकरणात फरार होता. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये मिर्झापूरच्या चुनार येथील कंपनी अधिकाऱ्याकडून खंडणी व हत्येच्या प्रकरणात मनीष सिंग सोनूचे नाव समोर आले होते. नोव्हेंबर 2020 मध्ये पोलिसांनी मनिषला जैतपुरा परिसरात घेरलं होतं. या चकमकीत रोशन गुप्ता उर्फ ​​बाबू उर्फ ​​किट्टू मारला गेला, तर मनीष पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

सोनू बिहार आणि नेपाळमध्ये लपून बसत होतानोव्हेंबर २०२० नंतर पोलीस सोनू याचा मागोवा घेत होते. पण तो काही हाती लागत नव्हता. यूपी पोलिसांच्या माहितीनुसार, मनिष बिहार आणि नेपाळमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. तो सातत्यानं त्याचं ठिकाण बदलत होता. जवळपास दीड वर्षांनंतर पोलिसांना मिळालेल्या टिपनुसार सोनू आज वाराणसीत असल्याचं कळलं. 

STF नं दिवसाढवळ्या केला एन्काऊंटरसोनूची माहिती मिळताच यूपी पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सनं त्याला घेरलं. यावेळी मनिष सिंह यानं पोलिसांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तो गोळीबारात ठार झाला. त्याच्याकडून ९ एमएम कारबाइन, ३२ बोर ची पिस्तुल आणि मोठ्या प्रमाणात काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात भाजपा सरकारचं पुनरागमनानंतरचा हा पहिलाच मोठा एन्काऊंटर आहे. ज्यात एक मोस्ट वॉन्टेड गुंड ठार झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ