शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह बदलल्याने यवतमाळच्या शहा हाॅस्पिटलमध्ये तोडफोड, हाॅस्पिटलमधील तोडफोडीची सलग दुसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 13:36 IST

नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी मोक्षधामात पोहोचले. तेथे मृतदेह उघडून बघितला असता, तो दुसऱ्याचाच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाईक हाॅस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे शुभम शेळके याने सदर मृतदेह त्याचे वडील दिगांबर लक्ष्मणराव शेळके यांचा असल्याचे सांगितले.

यवतमाळ : वडिलांऐवजी दुसऱ्याचाच मृतदेह दिल्याने अज्ञातांकडून येथील शहा हाॅस्पिटलमध्ये रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तोडफोड करण्यात आली.  ॲड. अरुण गजभिये यांचा येथील हाॅस्पिटलमध्ये शनिवारी रात्री मृत्यू झाला. रविवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.

नातेवाईक मृतदेह घेऊन अंत्यसंस्कारासाठी मोक्षधामात पोहोचले. तेथे मृतदेह उघडून बघितला असता, तो दुसऱ्याचाच असल्याचे लक्षात आले. त्यानंतर नातेवाईक हाॅस्पिटलमध्ये पोहोचले. तेथे शुभम शेळके याने सदर मृतदेह त्याचे वडील दिगांबर लक्ष्मणराव शेळके यांचा असल्याचे सांगितले. कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह सोपविल्यामुळे संतप्त होत ॲड. गजभिये यांच्या नातेवाईकांनी डाॅक्टर व उपस्थित कर्मचाऱ्यांना जाब विचारत रुग्णालयाची तोडफोड केली.  निवृत्त सहायक फाैजदार दिगांबर शेळके यांचाही शनिवारी रात्री कोरोनाने मृत्यू झाला. मात्र, बिलाची रक्कम जमा न केल्याने त्यांचा मृतदेह रुग्णालयाने दिला नाही, असा आरोप मनीषा दिगांबर शेळके यांनी केला.

मृतदेह आम्ही दिलाच नाही - डाॅ. सारिका शहा याप्रकरणी ॲड. गजभिये यांच्या नातेवाईकांना मृतदेह रुग्णालयाने दिलाच नसल्याचे डाॅ. सारिका शहा यांनी सांगितले. यामुळेही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. रुग्णालयाने जर ॲड. गजभिये यांच्या नातेवाईकांना मृतदेह दिला नसेल, तर तो त्यांनी कसा नेला, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. डाॅक्टरवर गुन्हा दाखल कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाचा मृतदेह देऊन निष्काळजीपणा केल्याप्रकरणी डाॅ. महेश शहा यांच्यावर अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ललित अरुण गजभिये याने याप्रकरणी तक्रार दिली. शुभम दिगांबर शेळके हाही पोलीस ठाण्यात हजर होता. दोघांचीही तक्रार एक करून गुन्हे नोंदविले गेले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर