नाशिकमध्ये रेडिएन्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 09:33 IST2021-04-29T08:38:49+5:302021-04-29T09:33:11+5:30
गेल्या आठ दिवसात हा या रुग्णालयात घडलेला दुसरा प्रकार आहे. सर्व डॉक्टर व कर्मचारी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत देवळाली गावातील गोतिसे परिवारातील काही सदस्यांकडून ही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप रुग्णलयाने केला आहे.

नाशिकमध्ये रेडिएन्ट हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड
नाशिक- शहरातील नाशिकरोड भागातील महात्मा गांधी रोड दुर्गा उद्यान समोरील रेडिएन्ट हॉस्पिटल येथे रुग्णाच्या नातेवाइकांकडून बुधवारी मध्यरात्री संतापाच्या भरात रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसात हा या रुग्णालयात घडलेला दुसरा प्रकार आहे. सर्व डॉक्टर व कर्मचारी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले आहेत देवळाली गावातील गोतिसे परिवारातील काही सदस्यांकडून ही तोडफोड करण्यात आल्याचा आरोप रुग्णलयाने केला आहे.
नाशिक मध्ये गेल्या दोन दिवसांत एकूण चार रुग्णलायांच्या बाबतीत असा प्रकार घडला आहे. परवा मध्यराती मुंबई नाका येथील मानवता रुग्णालयात भाजप नगरसेविकेच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर अति दक्षता विभागात तोडफोड करण्यात आली होती तर त्यापूर्वी सातपूर आणि इंदिरा नगर येथेही अशीच घटना घडली होती त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक शाखेने काम बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर लगेचंच आता ही घटना घडली आहे.