शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day: प्रेमदिनाला गालबोट, प्रेयसीने जाळलेल्या युवकाचा व्हॅलेंटाईन दिनीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 09:06 IST

Valentine Day: शुक्रवारी रावळगाव येथील युवतीने तिच्या कुटुंबीयांसह लोहोणेर येथे येऊन आपला प्रियकर गोरख बच्छाव याच्याशी वाद घालत, त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता.

नाशिक- जिल्ह्यातील लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११) प्रेयसीने कुटुंबीयांच्या मदतीने आपल्या प्रियकराला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना शनिवारी (दि.१२) कळवण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेतील युवक ८५ टक्के भाजल्याने उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात युवकाचा मध्यरात्री मृत्यू झाला. व्हॅलेंटाईन दिनीच या युवकाने अखेरचा श्वास घेतल्याने प्रेमादिनाला गालबोट लागले आहे. या घटनेने लोहोणेर गाव हादरले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शुक्रवारी रावळगाव येथील युवतीने तिच्या कुटुंबीयांसह लोहोणेर येथे येऊन आपला प्रियकर गोरख बच्छाव याच्याशी वाद घालत, त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्यासह गोकुळ तोंगल सोनवणे, निर्मला गोकुळ सोनवणे, तसेच तिचे दोन्ही भाऊ हेमंत गोकुळ सोनवणे व प्रसाद गोकुळ सोनवणे (सर्व रा.बी. सेक्शन, रावळगाव) यांना ताब्यात घेतले होते. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षांपूर्वी रावळगाव ता.मालेगाव येथील सदर युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. सदर विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय मुलीच्या घरच्यांना आला. 

मुलीचे लग्न मोडल्याने मुलीसह तिचे कुटुंबीय लोहोणेर येथे आले. यावेळी गोरख याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून, मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले, यात तो गंभीर जखमी झाला होता. घटना घडल्यानंतर संबंधित युवती व तिचे कुटुंबीय स्वतः पोलिसांत हजर झाले होते. त्यानंतर, देवळा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. शनिवारी (दि.१२) त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज पहाटे गोरखचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

व्हॅलेंटाईनदिनी झाले निधन

लाहेणेर गावातील या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. शनिवारी लोहोणेर गावातही सन्नाटा पसरलेला होता. गोरख बच्छाव हा ८५ टक्के भाजला, त्याच्यावर नाशिकला जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले, पण, मध्यरात्री युवकाचा मृत्यू झाला, याबाबत पहाटे माहिती देण्यात आली. व्हॅलेंटाईन दिनीच प्रेमप्रकरणातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेतून युवकाने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे, प्रेमदिनाला गालबोट लागले. 

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेPoliceपोलिसNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट