Gujarat Crime: संशय माणसाचा संसार कसा उद्धवस्त होतो याचे दोन धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. गुजरातच्या वडोदरामध्ये एका पतीने पत्नीवर नजर ठेवण्यासाठी घरात चक्क सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, मात्र तरीही संशय न मिटल्याने त्याने पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली. दुसरीकडे, तमिळनाडूमध्ये एका पतीने बसस्थानकावर पत्नीचा पाठलाग करून तिची कुऱ्हाडीने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
सीसीटीव्ही लावूनही संशय
वडोदरा येथील बकरावाडी परिसरातील नारायण एव्हेन्यूमध्ये राहणाऱ्या बंटी सोलंकी याने आपली पत्नी रीटाबेन हिची निर्घृण हत्या केली. शनिवारी मध्यरात्री बंटी आणि रीटा यांच्यात जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या बंटीने घरात असलेल्या चाकूने रीटावर वार केले. गंभीर दुखापत झाल्यामुळे रीटा यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंटीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तिचे बाहेर अफेअर असल्याचा त्याला संशय होता. यावर नजर ठेवण्यासाठी त्याने घरात सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले होते. तरीही दोघांमधील वाद मिटला नाही आणि अखेर या वादाचा शेवट हत्येत झाला. या घटनेमुळे १३ वर्षांचा मोठा मुलगा आणि अवघ्या अडीच वर्षांचा लहान मुलगा पोरका झाला आहे. पोलिसांनी काही तासांतच आरोपी पतीला अटक केली आहे.
तमिळनाडूत बसस्थानकावर थरार
तमिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात रविवारी भररस्त्यात हत्येचा असाच एक प्रकार घडला. सुधाकर नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी पेचीअम्मल हिचा बसस्थानकावर पाठलाग केला आणि तिची कुऱ्हाडीने हत्या केली. मतभेदांमुळे हे जोडपे गेल्या काही काळापासून वेगळे राहत होते. मात्र, सुधाकरला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याने तिची भरदिवसा हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर सुधाकरने स्वतःहून जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. या जोडप्यालाही दोन मुले आहेत.
Web Summary : In Gujarat, a husband, driven by suspicion despite installing CCTV, murdered his wife. A similar incident occurred in Tamil Nadu where a husband murdered his wife at a bus stop. Both couples leave behind orphaned children.
Web Summary : गुजरात में, CCTV लगाने के बावजूद शक के चलते एक पति ने अपनी पत्नी की हत्या कर दी। तमिलनाडु में भी ऐसी ही घटना हुई जहाँ एक पति ने बस स्टॉप पर अपनी पत्नी की हत्या कर दी। दोनों जोड़ों के बच्चे अनाथ हो गए।